Jalgaon Jowar News Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Harvesting : खानदेशात दादर ज्वारी आली मळणीवर

दादर ज्वारी पेरणीसाठी घरात साठविलेले पारंपरिक बियाणे शेतकरी वापरतात. आकाराने बारीक, पांझरी शुभ्र व कडक दाणा, अशी दादर ज्वारीची ओळख आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दादर ज्वारीचे (Dadar Jowar) पीक पक्व झाले आहे. अनेक भागात पीक मळणीवर (Jowar Harvesting) आले असून, कापणीदेखील सुरू झाली आहे.

खानदेशात कोरडवाहू (Dry Land Crop) दादर ज्वारीचे पीक चांगले होते. पेरणी ऑक्टोबरअखेरिस व नोव्हेंबरमध्ये झाली होती.

दादर ज्वारी पेरणीसाठी घरात साठविलेले पारंपरिक बियाणे शेतकरी वापरतात. आकाराने बारीक, पांझरी शुभ्र व कडक दाणा, अशी दादर ज्वारीची ओळख आहे.

अनेक शेतकरी संकरित, विद्यापीठांनी संशोधन केलेल्या दादर ज्वारी वाणांची पेरणीदेखील खानदेशात करतात. यंदा कोरडवाहू दादर ज्वारीची जळगाव जिल्ह्यात सुमारे २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली होती.

तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १५ हजार हेक्टरवर कोरडवाहू दादर ज्वारीचे पीक होते. दादर ज्वारी पाठोपाठ उशिरा पेरणीच्या संकरित ज्वारीची पेरणीदेखील बऱ्यापैकी आहे. या ज्वारीची पेरणी डिसेंबर, जानेवारीतही झाली आहे.

या ज्वारीस काळ्या कसदार जमिनीत तीन वेळेस सिंचन करावे लागते. धान्य व चाऱ्याच्या उत्पादनासाठी अनेकांनी संकरित ज्वारीची पेरणी केली होती. खानदेशात दादर ज्वारी व इतर संकरित ज्वारीची मिळून सुमारे ६५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

यात उशिरा पेरणी केलेल्या किंवा डिसेंबर, जानेवारीत पेरणी केलेली दादर ज्वारी निसवत आहे. किंवा त्यात दाणे भरत आहेत. परंतु ऑक्टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये पेरणी केलेल्या दादर ज्वारीचे पीक मळणीवर आले आहे.

कोरडवाहू क्षेत्रात पीक अधिक मळणीवर आहे. काही शेतकऱ्यांनी दादर ज्वारीस एक वेळेस पाणी दिले आहे. पिकास कुठलीही फवारणी, खते शेतकऱ्यांना देण्याची आवश्यकता नसते. कारण दादर ज्वारी कोरडवाहू क्षेत्रातील हुकमी पीक मानले जाते. ते १०० टक्के रसायनमुक्तही असते.

दादर ज्वारीचे धान्य, चारा यास चांगला उठाव असतो. मागील हंगामात दादर ज्वारीचा कडबा प्रतिशेकडा तीन हजार रुपये या दरात विकला जात होता. काळ्या कसदार जमिनीत कोरडवाहू दादर ज्वारी पीक अधिक होते.

कापणी व कणसे शेतातच एका ठिकाणी गोळा करण्यासाठी एकरी तीन हजार किंवा यापेक्षा अधिकची मजुरी लागत आहे. पुढील आठवड्यात अनेक भागात मळणी होईल, असे चित्र आहे. यंदा एकरी आठ ते १० क्विंटल उत्पादन येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

या भागात ज्वारी पीक अधिक...

जळगाव, अमळनेर, चोपडा, भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर या भागात दादर ज्वारीचे पीक अधिक होते.

तसेच नंदुरबारमधील शहादा, तळोदा, नंदुरबार भागातही दादर ज्वारी पीक जोमात होते. या भागात पीक मळणीवर आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी सुरू केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean MSP Center Closure: आळेफाट्यात सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्रे बंद

Agriculture Drone: ड्रोनची उड्डाण वाढू लागली

Sunetra Pawar Chairperson: माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार

Cotton Picking Labour Shortage: कापूस वेचणीसाठी मजूरटंचाई

MPKV Rahuri Convocation: महात्मा फुले कृषी विद्यापीठात उद्या पदवीप्रदान समारंभ

SCROLL FOR NEXT