Sangli Currant Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Currant Market : सांगलीत बेदाणा दरात प्रतिकिलो ४० रूपयांची वाढ; उत्पादनात मात्र घट

Sangli Market Committee : एक महिना लवकर होळी व रमजान सण आहेत. यामुळे येत्या महिनाभरात मागणी वाढल्यास बेदाण्यास २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे.

sandeep Shirguppe

Sangli Bedana Rate : सांगली जिल्ह्यात दिवाळीपूर्वी शून्य पेमेंटसाठी एक महिना बेदाणा सौदे बंद होते, तेव्हा चांगल्या बेदाण्यास प्रतिकिलो दर १५० ते १६० रुपये होता. परंतु, दिवाळीनंतर बेदाणा दरात प्रतिकिलोस सरासरी ४० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, एक महिना लवकर होळी व रमजान सण आहेत. यामुळे येत्या महिनाभरात मागणी वाढल्यास बेदाण्यास २२० ते २५० रुपये दर मिळणे शक्य आहे. नैसर्गिक संकटामुळे ४० टक्के द्राक्ष उत्पादन घटल्यामुळेही द्राक्षाला चांगला दर आहे.

याबाबत सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा द्राक्षासह बेदाण्यास चांगला दर मिळण्याची शक्यता आहे. सध्या मागणी वाढत असून रमजान, होळी सणाच्या काळात आणखी दरात तेजीची शक्यता आहे. शेतकऱ्यांना आम्ही चांगल्या सुविधा देत असल्याने भविष्यातही सौद्यासाठी बेदाणा सांगलीत आणावा. असे आवाहन सचिव चव्हाण यांनी केले.

सध्या सांगली बाजार समितीत येणाऱ्या बेदाण्यास १८० ते २०० रुपये दर मिळत आहे. मध्यम बेदाण्यास १६० ते १७० रुपये दर मिळतो तर काळा बेदाण्यास ९० ते १२० रुपये किलो दर मिळत आहे. मागील वर्षी हंगाम सुरुवातीलाच ६० हजार टन जुना बेदाणा शिल्लक होता आणि त्याचवेळी अडीच ते पावणेतीन हजार गाडी नवीन बेदाणा बाजारात येत होता. यंदा ही आवक केवळ २० गाड्यांवर आली आहे. यामुळे दर चांगला मिळणार आहे.

आगामी काळात येणाऱ्या सणांमुळे देशभरातून बेदाण्याला मागणी वाढते. नवीन बेदाणा बाजारात येण्यासाठी मार्च अखेर उजाडणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आगाप बागांची छाटणी केली आहे. त्यांनी बेदाणा बाजारात आणला तर त्यांच्यासाठी सोन्याचे दिवस असतील असा अंदाज द्राक्ष बागायतदार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

यंदा अतिवृष्टी, नैसर्गिक संकटामुळे बाजारात द्राक्ष कमी आली. ४० ते ४५ टक्क्यांनी उत्पादन घटले. परिमाणी प्रतिकिलो ९० ते १२० रुपये दर मिळत आहे. शेतकऱ्यांनी बेदाण्यासाठी सोडलेल्या बागाही व्यापारी मार्केटिंगसाठी व्यापारी खरेदी करीत आहेत. उशिरा ऑक्टोबरमध्ये झालेल्या छाटणीमुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये द्राक्ष शेडवर जातील आणि मार्चअखेर एप्रिलमध्ये नवीन बेदाणा बाजारात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT