Bedana Market : ‘जीएसटी’ मुक्त उत्पादनात आता बेदाण्याचा समावेश

Team Agrowon

द्राक्षापासून उत्पादित बेदाणा (मनुका)यास कृषी उत्पादनाचा दर्जा देत वस्तू व सेवा (जीएसटी) करातून वगळण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे मागणी केली. या पाठपुराव्याला यश आले आहे.

Bedana Market | Agrowon

वस्तू व सेवा कर परिषदेची ५५ वी बैठक शनिवारी (ता. २१) जैसलमेर(राजस्थान) येथे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या परिषदेत देशभरातील सर्व राज्यांचे अर्थमंत्री, मंत्री सहभागी झाले आहेत.

Bedana Market | Agrowon

या परिषदेत महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधित्व महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले.

Bedana Market | Agrowon

हळद, गूळ याप्रमाणेच बेदाणा कृषी उत्पादन असल्याने त्याला वस्तू व सेवा करातून वगळण्याची शिफारस मंत्री तटकरे यांनी केली होती. त्यास परिषदेत मान्यता देण्यात आली आहे.

Bedana Market | agrowon

यापूर्वी ५ टक्के वस्तू व सेवा कर (जीएसटी) असणारे हे उत्पादन आता करमुक्त झाले आहेत. बेदाणे, हळद, गूळ हे महाराष्ट्र मूल्यवर्धित करात (MVAT) करमुक्त होते.

Bedana Market | agrowon

बेदाणा या अपवादाव्यतिरिक्त इतर सुकामेवा कराच्या कक्षेत येत होता. इतर कुठलीही प्रक्रिया न करता केवळ द्राक्षे सुकवून बेदाणे तयार करण्यात येतात. त्यामुळे याला कृषी उत्पादनाचा दर्जा देत सध्याच्या ५ टक्के कर कक्षेतून वगळण्याची मागणी करण्यात आली होती.

Bedana Market | Agrowon

या मागणीवर सकारात्मक निर्णय होऊन शेतकऱ्यांकडून विक्री होणारे बेदाणे करमुक्त झाले आहेत.

Bedana Market | Agrowon

५ टक्के जीएसटी तसेच कोल्ड स्टोअरेजमध्ये ठेवलेल्या बेदाणा भाडेपट्ट्यावर लावला जात असलेला १८ टक्के जीएसटी पूर्ण माफ करावा, अशी मागणी राज्य द्राक्ष बागायतदार संघाने सातत्याने केली होती.

Bedana Market | Agrowon

राज्यातील नाशिक, सांगली अशा जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर मनुक्याचे उत्पादन होते. तसेच महिला बचत गट ही यात मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.

Bedana Market | agrowon
आणखी पाहा...