Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : ऊस गळीत हंगाम प्रारंभ तारखेची उत्सुकता

Raj Chougule

Kolhapur News : यंदाचा गळीत हंगाम कधी सुरु करायचा, याबाबत निर्णय घेण्यासाठी मंत्री समितीची बैठक येत्‍या आठवड्यात होण्‍याची शक्यता आहे. यंदा उसाचे उत्पादन घटण्याची शक्यता असल्याने हंगाम सुरु करण्याबाबत विविध घटकांकडून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. ‘विस्‍मा’ने १५ ऑक्टोबर पासून हंगाम सुरु करण्याची मागणी केली आहे.

तर मजुरांची उपलब्धता होण्‍यासाठी १५ नोव्हेंबर पासून हंगाम सुरु करण्याबाबतही मागण्या आहेत. या सर्व घटकांचा सुवर्णमध्य साधून हंगाम सुरु करण्याचा कालावधी जाहीर करण्याचे आव्‍हान मंत्री समितीपुढे आहे. सारासार अंदाज घेऊन १ नोव्हेंबरपासून हंगाम सुरु होऊ शकतो, अशी शक्यता आहे.

सध्या मॉन्सून राज्यातून परतत आहे. शेवटच्या टप्प्‍यात काही भागात चांगला पाऊस झाला असला तरी अंतिम टप्प्यातील उसाच्या वाढीवर या पावसाचा विशेष परिणाम झाला नाही. कोल्हापूर, सांगलीसह सातारा, सोलापूर हे ऊस पट्यातील जिल्हे तहानलेलेच राहिले.

अंतिम टप्प्यातील पावसामुळे उसाच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होईल, हा अंदाज फारसा बरोबर ठरला नाही. यातच आता ऑक्टोंबर हीट मुळे उसाला पुन्हा पाण्याची गरज लागेल. ही सर्व परिस्थिती पाहता यंदा हंगाम नेमका कधी सुरु करायचा हा निर्णय घेण्यासाठी समितीचा कस लागेल.

पावसाअभावी उसाचे घटलेले क्षेत्र, विविध साखर कारखान्यांनी वाढविलेली क्षमता यामुळे यावर्षी ऊस गाळप हंगाम कसाबसा केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. देशातील साखर उत्पादनापैकी सुमारे एक तृतीयांश साखर उत्पादन महाराष्ट्रात होते. २०२२-२३ हंगामात राज्यातील कारखान्यांनी १०० टन साखर उत्पादन घेतले होते. यंदा यात मोठी घट अपेक्षित आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत गुऱ्हाळघरे आणि खांडसरी सुरू झाल्या आहेत. अनेक शेतकरी आपला ऊस गुऱ्हाळघरे आणि खांडसरीला पाठवीत आहेत. राज्यातील गाळप हंगाम उशिरा सुरु झाला तर काही शेतकरी तोपर्यंत गाळपासाठी अन्य पर्याय स्वीकारू शकतात.

त्याचा फटका साखर कारखान्यांना बसू शकतो. त्यामुळे १५ ऑक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची मागणी ‘विस्मा’ची आहे. विशेष करून मराठवाड्यामध्ये यंदा बिकट परिस्‍थिती असल्याने कारखाने लवकर सुरु करण्याची मागणी आहे.

...तर शेतकरी, कारखान्यांचेही नुकसान

संभाव्य मजूर उपलब्धता, दिवाळीचा कालावधी, व थंडीचे प्रमाण याचा विचार करून १५ नोव्हेंबर पासून हंगाम सुरु करावा, असा एक मतप्रवाह काही कारखानदारांचा आहे. ऑक्टोबरमध्ये हंगाम सुरू केल्यास अपरिपक्व ऊसही कारखान्यांत येईल. परिणामी शेतकऱ्यांचे, उतारा कमी आल्याने कारखान्यांचेही नुकसान होईल, असेही साखर उद्योगातील काही तज्ञांचे मत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

Village Development : एकात्मिक प्रयत्नांतून आर्थिक संपन्न गाव निर्मिती शक्य

Milk Production Issue : भ्रूण प्रत्यारोपित कालवडी वाटपाची घाई कशाला?

Artificial Intelligence : केंद्र सरकारकडून दिल्लीत ३ कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेंटर्स स्थापन करण्याची घोषणा

SCROLL FOR NEXT