Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : सोलापूर जिल्ह्यातील २० साखर कारखान्यांना गाळप परवाने

Sugarcane Crushing : राज्य शासनाने यंदाच्या ऊसगाळप हंगामासाठी कारखान्यांना १५ नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांपैकी २० साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत.

Team Agrowon

Solapur News : राज्य शासनाने यंदाच्या ऊसगाळप हंगामासाठी कारखान्यांना १५ नोव्हेंबरपासून परवानगी दिली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांपैकी २० साखर कारखान्यांना गाळप परवाने मिळाले आहेत. पण सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे.

त्यातच जिल्ह्यातील सहा साखर कारखान्याचे चेअरमन प्रत्यक्ष निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने कारखान्याची यंत्रणा या कामात लागलेली आहे. तर अन्य काही चेअरमन, संचालक मंडळ इतर उमेदवारांच्या प्रचारात गुंतल्याने गाळप हंगामाला मतदानानंतरच २३ नोव्हेंबरपासून खऱ्या अर्थाने गती येणार आहे.

राज्यामध्ये सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची ओळख सांगितली जाते. सोलापूर जिल्ह्यात खासगी आणि सहकारी असे ३३ साखर कारखाने आहेत. तर जिल्ह्यात यंदाही जवळपास दीड लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर ऊसक्षेत्र आहे.

गेल्या वर्षी कमी झालेला पाऊस, पूर्ण क्षमतेने न भरलेले उजनी धरण यामुळे तुलनेने यंदा ऊस कमीच उपलब्ध होणार असला, तरी योग्य नियोजन केल्यास उसाचा तुटवडा भासणार नाही, तरीही यंदाच्या हंगामासाठी साधारण १२५ ते १३० लाख टन ऊस उपलब्ध होईल, तसेच पुढील १२० ते १५० दिवस हा गाळप हंगाम चालेल, असा अंदाज आहे.

पण सध्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. जिल्ह्यातील बहुतांश कारखानदार निवडणुकीच्या प्रचारात गुंतले आहेत. अनेक कारखान्यांनी बॉयलर पेटवून ठेवले आहेत. तर काहींचे बॉयलर अजून पेटायचे आहेत. त्याशिवाय ऊस तोडणी वाहतूक मजूरही केवळ ५० टक्के इतकाच दाखल झाला आहे. त्यामुळे सध्या तरी हंगामाला परवानगी मिळाली असली, तरी खरा वेग मतदानानंतरच येणार आहे.

ऊसदर गुलदस्तात

दरवर्षी हंगामाच्या आधीच ऊसदरावरून रान पेटलेले असते. पण यंदा कारखानदारच विधानसभा निवडणुकीत अडकल्याने आणि आचारसंहिता असल्याने ऊसदराबाबत कोणीच भूमिका जाहीर केलेली नाही. जिल्ह्यातील ऊसदर अद्यापही गुलदस्तातच आहे. त्यामुळे मतदानानंतरच त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Market : पुसद बाजार समितीत चोवीस हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Agriculture Irrigation : ‘धरणातून रब्बी हंगामासाठी पाणी आवर्तने सोडा’

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Farm Pond : धाराशिवला दहा वर्षांत उभारली ४ हजार २६२ शेततळी

Tree Cutting Tender : हजारो झाडांचा अवघ्या दीड लाखाला सौदा

SCROLL FOR NEXT