Fish  Agrowon
ॲग्रो विशेष

Fish Market : मासे खरेदीसाठी खवय्याची गर्दी

Fish Rate : श्रावण संपल्यानंतर अनेक मांसाहारप्रेमी बाजारात मासे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बहुतेक मांसाहारी श्रावणात मांसाहार करणे टाळतात.

Team Agrowon

Kasa News : श्रावण संपल्यानंतर अनेक मांसाहारप्रेमी बाजारात मासे खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेत. बहुतेक मांसाहारी श्रावणात मांसाहार करणे टाळतात. मात्र, श्रावण संपल्यानंतर पहिला दिवस बुधवार आल्याने आणि तीन दिवसांनी गणेशोत्सवाला सुरुवात होणार असल्याने आज खवय्यांनी गर्दी केली होती.

दोन-तीन महिन्यांच्या जोरदार पावसामुळे आणि मासेमारी बंदी असल्यामुळे बोटी समुद्रात जाऊ शकल्या नव्हत्या. त्यामुळे बाजारात कमी प्रमाणात मासे दिसत होते. या काळात नदी आणि धरणातील गोड्या पाण्यातील मासे बाजारात विक्रीसाठी येत होते.

मात्र, नारळी पौर्णिमेनंतर अनेक मच्छीमार बोटी समुद्रात मासेमारीसाठी निघाल्याने सध्या मोठ्या प्रमाणात मासे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. गणेशोत्सव दोन-चार दिवसांवर आला आहे.

गणेशोत्सवानंतर मांसाहारास सुरुवात करणारे भाविकांनी श्रावण महिना संपताच माशांवर ताव मारण्यास सुरुवात केली. बुधवारी बाजारात अनेकांची पावले मासे खरेदी करताना दिसत होती.

सध्या बाजारात कोळंबी, बोंबील, मांदेली, दाताळ, पापलेट यांसारखे समुद्रातील मासे आणि गोड्या पाण्यातील विविध प्रकारचे मासे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खवय्यांनीही माशांवर ताव मारण्यास सुरुवात केली आहे.

श्रावण संपल्याने जवळपास एक महिन्यानंतर आम्ही मांसाहार सुरू केला आहे. त्यात समुद्रातील मासेही आता विक्रीस येत आहे. त्यामुळे आम्ही ते विकत घेत आहोत.
- दीपा भोईर, मासे खवय्ये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement Registration: सोयाबीन खरेदी केंद्रांवर नोंदणीचे तीन-तेरा

Onion Price: अहिल्यानगरला कांदा १९०० रुपये

Cotton Procurement: कापसाची खरेदी मर्यादा यंदा कमी असल्याने रोष

Micro Irrigation: ठिबक अनुदानासाठी आता केवळ पाचच कागदपत्रे लागणार

Maharashtra Rain: राज्यात दक्षिण भागात पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT