ॲग्रो विशेष

Crop Damage : ‘ओझरखेड’च्या आवर्तनाने पिके पाण्याखाली

Team Agrowon

Nashik News : चार दिवसांपूर्वी ढगफुटीसदृश पावसाने निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी परिसरातील सहा गावांना झोडपले. अशात शेतातील पाणी अजून ओसरले नसताना ओझरखेड पाटबंधारे विभागाने कालव्याचे आवर्तन सोडल्याने द्राक्ष, सोयाबीन, मका, टोमॅटो पिकांच्या शेतात पाणी गेल्याने सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसामुळे द्राक्ष बागांची छाटणी खोळंबली असून इतर पिके सडू लागली आहेत. ओझरखेड विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवर्तन बंद न केल्यास कालव्यात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता. अखेर पाणी बंद झाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

पावसाच्या संकटाशी शेतकरी सामना करीत आहेत. त्यात आता ओझरखेड धरणाच्या प्रशासनाने कालव्याला पाणी सोडल्याने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले गेल्याची स्थिती होती. त्यामुळे शिरवाडे वणीपासून गोरठाण, वावी, सावरगाव, सारोळे खुर्द या गावांतील शेतशिवारातून जाणाऱ्या कालव्याला मोठी गळती दिसून आली.

कालव्याचे आवर्तन सोडल्याने गळतीमुळे पाणी शेतात घुसले होते. शेतात चिखल असल्याने सोयाबीन, मका पिकाची काढणी खोळंबली आहे. सध्या दर मिळणाऱ्या टोमॅटोचे नुकसान होते. तर द्राक्षबागा छाटणीचे नियोजन बिघडले. यामध्ये सुमारे ४०० हेक्टर शेतीला कालवा आवर्तनाच्या पाण्याने बाधित केल्याची स्थिती दिसून येत होती.

आवर्तन सोडण्यासाठी आंदोलन करावे लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता ओझरखेड धरणाचे दरवाजे बंद करण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली होती. कालव्याचे आवर्तन न थांबविल्यास कालव्याच्या पाण्याचा फटका बसलेल्या गावातील शेतकऱ्यांनी कालव्याच्या पाण्यात जलसमाधी आंदोलनाचा इशारा पाटबंधारेला दिला होता.

१२ तासांतच सोडलेले पाणी बंद

चांदवड तालुक्यात काही गावांना पाण्याची चणचण आहे. त्यांच्या मागणीमुळे कमी दाबाने आवर्तन दिले. निफाड तालुक्यात शेतकऱ्यांच्या भावना ओळखून त्यावर योग्य तो निर्णय घेतला आहे.

वाहेगाव वाकी पिंपळद या परिसरातील चारी क्र.३३ व ३४ वरील शेतकऱ्यांची मागणी होती. त्यानुसार बुधवारी (ता. १६) पाणी सोडल्यानंतर १५ किलोमीटरपर्यंत पोहोचले होते. मात्र गुरुवारी (ता. १७) अवघ्या १२ तासांतच बंद करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Silk And Milk Project : परभणी जिल्ह्यातील ९ गावांमध्ये सिल्क आणि मिल्क प्रकल्प

Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

Ration Grain : रेशन धान्य वाटपात सोलापूर राज्यात प्रथम

Orchard Cultivation : जलकुंड आधारित फळबाग लागवड वरदान

Grape Producer : द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडवा

SCROLL FOR NEXT