Crop Damage
Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik Crop Damage : गारांच्या फटक्यात पिके अन् बळीराजाही घायाळ

मुकुंद पिंगळे

Nashik News : दुपारनंतर वातावरण ठीक होते. अचानक चार वाजेनंतर आभाळ झाकून आले आणि साडेचार वाजेनंतर आभाळातून दगडे पडावीत, अशा टपोऱ्या गारा (Hail) पडू लागल्या. घरातून बाहेर येणे शक्य नसल्याने घराचा दरवाजा बंद करून थांबलो.

पाच वाजेनंतर घराच्या बाहेर येऊन बागेत (Vineyard) पाहिले तर सोन्यासारखा पिकविलेला निर्यातक्षम द्राक्षमाल (Export Quality Grape) गारांच्या फटक्यात घायाळ होऊन तुटून पडला. काही क्षणात द्राक्ष मण्यांचा (Grape Crop Damage) बोधावर सडा पडला. हे नुसते संकटच नव्हते, तर अख्खे आभाळ आमच्यावर कोसळले.

गारांच्या फटक्यात पिकेही आणि बळीराजाही घायाळ झाला, अशी कैफियत कुंभारी(ता. निफाड) येथील शेतकरी बाळासाहेब घंगाळे यांनी मांडली.

शनिवारी (ता.१८) सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे (Hailstorm) प्रामुख्याने कुंभारी, पंचकेश्वर, रानवड, उगाव परिसरात तुफान गारपीट झाली. वर्षातून एकदाच येणार द्राक्षासारखे पीक काही क्षणात चक्काचूर व्हावे अशीच परिस्थिती होती.

द्राक्षघडांना जबर मार लागल्याने मणी चिरून तुटून पडले आहेत. निर्यातक्षम बागांमध्ये थोड्याफार प्रमाणात माल वाचला आहे. जो माल ६० ते ७० रुपये प्रतिकिलोप्रमाणे जाणार होता. मात्र आता तो कवडीमोल ३ ते ४ रुपये दराने विक्री करावा लागत आहे.

‘‘आता आम्ही जगायचं कसं आणि पुन्हा उभ राहायचं कसं?, ’’ अशा कातरत्या शब्दात नुकसान झालेले शेतकरी हतबलता व्यक्त करीत आहेत. ज्यावेळी गारा पडत होत्या. त्यावेळी घराची कवाडे लावून मोठ्या माणसांसह घरातील बालके लाखोंचे नुकसान होताना पाहून रडत होती.

‘आता कसं उभं राहू?’

द्राक्ष माल तयार झाला होता. व्यापारी माल पाहून गेला. दोन दिवसांत सौदा होऊन खुडे सुरू होणार होता. यंदा माल निर्यातक्षम असल्याने कर्ज फिटेल, अशी अपेक्षा होती. मात्र गारांच्या तडाख्यात सगळ अवघड झालं. आता आमचे हात पाय गळून गेले.

७१ रुपये प्रति किलोपर्यंत भाव जाईल, अशी प्राथमिक बोलणी झाली होती. मात्र आता हा खराब झालेला माल काय भावाने जाईल, हे आता सांगता येणार नाही. व्यापाऱ्यांशी द्राक्ष नेण्यासाठी संपर्क करतोय. मात्र व्यापारी म्हणतात ‘तुमच्या बागेत गारा झाल्या आहेत.’

आमचा शेतीमाल मातीमोल झाला आहे. अगोदरच बँकांनी शेतकऱ्यांना वित्त पुरवठा करणे बंद केले आहे. पुढे काय करू आणि कसं उभं राहू?, अशी उद्विग्नता कुंभारी, उगाव, रानवड येथील शेतकऱ्यांनी मांडली.

ठळक नुकसान असे:

- निफाड तालुक्यात १४६५.४५ हेक्टरवर नुकसान

- ४० गावांमध्ये ३०९७ शेतकरी प्रभावित

- द्राक्ष, गहू, कांदा, भाजीपाला, मका पिकाला फटका

प्रमुख पिकांचे प्राथमिक नुकसान

पिके....नुकसान (हेक्टरी)

द्राक्ष...६८४.३८

गहू...६१८.६२

कांदा...१२९.५

भाजीपाला...३३

(संदर्भ: कृषी विभाग)

द्राक्ष पिकांची नुकसान स्थिती

कुंभारी, पंचकेश्वर, उंबरखेड, पिंपळगाव बसवंत, रानवड, उगाव, शिवडी, देवपूर, खडक माळेगाव, शिरवाडे वणी, गोरठाण, वावी, देवपूर, तारूखेडले, तामसवाडी, करंजी खुर्द, ब्राम्हणवाडे, दीक्षी, दात्याने, ओणे, जिव्हाळे, थेरगाव, चांदोरी, नागापूर, चितेगाव, चेहडी खुर्द, करंजगाव, चापडगाव, बेहेड, खानगाव थडी, नांदूर मधमेश्वर, गाजरवाडी, दिंडोरी, खेडे, नांदुर्डी, वनसगाव, ब्राह्मणगाव वणस, नैताळे, रामपूर, सोनेवाडी खुर्द, सोनेवाडी बुद्रूक.

लाल खरीप कांदे होते. त्याला दर मिळाले नाहीत. ७० हजार रुपयांपर्यंत खर्च करून आता काहीच फायदा झालेला नाही. हा उन्हाळ कांदा येणार नाही. थोडाफार आला तर टिकणार नाही. पंचनामे झाले आहेत, मात्र मिळणाऱ्या २-३ हजारांत काय होणार? -
रमेश नामदेव शेजवळ, कांदा उत्पादक, कुंभारी, ता. निफाड.
दगडासारख्या गारा पडल्या. तीन इंचापर्यंतचा थर जमला होता. माझा ‘आर के’ द्राक्ष वाण दुसऱ्या दिवशी काढायचा होता. मात्र अवघ्या १५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. संपूर्ण १०० टक्के माल बाधित आहे. बँकेचे कर्ज काढून ४ लाख खर्च केला आहे. कर्ज कस भरू?
ज्ञानेश्वर घंगाळे, द्राक्ष उत्पादक, कुंभारी, ता. निफाड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT