Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage तेलंगणा आणि आंध्रात पावसाचा कहर ; मराठवाड्यात लाखो हेक्टरवरील पिके जमिनदोस्त

Marathwada Heavy Rain : सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Mahesh Gaikwad

Pune News : गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील मराठवाड्यासह आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले आहे. आंध्र आणि तेलंगणा या दोन राज्यात पावसानंतर आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दोन्ही राज्यांत प्राथमिक आकडेवारीनुसार, चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात लाखो हेक्टर क्षेत्र बाधित

सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात मराठवाड्यात झालेल्या पावसामुळे परभणी, नांदेड, बीड आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे मराठवाड्यात ११.७७ लाख हेक्टरवरील शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

यामध्ये नांदेड जिल्ह्याला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून तीन लाख हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर परभणी जिल्ह्यात २.८६ लाख हेक्टर आणि हिंगोली जिल्ह्यातील २.५८ लाख हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे. याशिवाय जालना जिल्ह्यात नुकसानाचा आकडा १.७९ लाख हेक्टरवर पोहोचला आहे.

आंध्रात २ लाख शेतकरी बाधित

मुसळधार पावसामुळे आंध्र प्रदेशमध्ये आलेल्या पुरामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पाऊस आणि पुरामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानामुळे येथील शेतकरी हवालदिल झाले आहेत. आंध्र प्रदेशात मुसळधार पावसानंतर आलेल्या आपत्तीमुळे २० जिल्ह्यातील २ लाख शेतकरी बाधित झाले आहेत. तर, १.६९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १९ हजार हेक्टरवरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.

रायथू संगमकडून भरपाईची मागणी

दुसरूकडे तेलंगणा राज्यातही पावसामुळे दोन लाख हेक्टर शेतीला फटका बसला आहे. पावसामुळे खरीपातील कापूस आणि हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रायथू संगम संघटनेने अन्न पिकांच्या नुकसानापोटी प्रति एकर २५ हजार रुपये तर व्यवसायिक पिकांसाठी ५० हजार रुपये प्रति एकर भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. दरम्यान, तातडीची तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यानी नुकसान भरपाईपोटी १० हजार रुपये एकरी मदत जाहीर केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CJP Protest: तरुणांच्या आंदोलनाची धग वाढली, देशभरातून पाठिंबा, सरकारकडून चर्चेची तयारी, पण 'सीजेपी'ने ठेवल्या अटी

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, हरभरा आवक स्थिर, टोमॅटो भाव कायम,शेपू दबावातच तर मोसंबी दरात नरमाई

Government Schemes Planning: योजनांच्या लाभासाठी सक्षम प्रकल्प आराखडा महत्त्वाचा : अनिसा महाबळे

Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?

Buldhana DCC Bank Election: बुलडाणा जिल्हा बँकेची निवडणूक ठरणार लक्षवेधी

SCROLL FOR NEXT