Crop Advisory Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीमुळे पीकनिहाय घ्यावयाची दक्षता

Post Monsoon Crop Advisory : काही ठिकाणी कांदे बाग लागवडीमध्ये फळ काढणी सुरू असून, येथील घडांची काढणी करून त्वरित विक्री करावी.

Team Agrowon

कांदा ः

काढणी बाकी राहिलेल्या खरीप कांद्याची त्वरित काढणी करून विक्री करावी. रब्बी कांदा रोपवाटिकेमध्ये आणि रांगडा कांद्याच्या पुनर्लागवडीमध्ये कार्बेन्डाझीम १ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी स्टिकरसह फवारणी पाऊस थांबल्यानंतर करावी. शेतात साठलेल्या पाण्यामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यासाठी याच बुरशीनाशकांचे ‘ड्रेंचिंग’ करावे, असा तातडीचा सल्ला राजगुरुनगर येथील राष्ट्रीय कांदा संशोधन संचालनालयाचे संचालक विजय महाजन यांनी दिला आहे.

केळी

काही ठिकाणी कांदे बाग लागवडीमध्ये फळ काढणी सुरू असून, येथील घडांची काढणी करून त्वरित विक्री करावी. जून लागवडीच्या बागेतील झाडे शाखीय वाढीच्या अवस्थेत असून, सिगाटोका रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यासाठी कार्बेन्डाझीम किंवा प्रोप्रीकोनॅझोल यांची शिफारशीप्रमाणे आलटून पालटून फवारणी करावी. पाऊस जास्त झाल्यास बागेत पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

भाजीपाला

वाटाणा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शिफारशीप्रमाणे उपाययोजना कराव्यात. मिरची, टोमॅटो पिकावर रस शोषणाऱ्या किडींचा तसेच बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, बुरशीनाशकाची संरक्षणात्मक फवारणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान वेलवर्गीय झाडांना काठीने आधार द्यावा.

गहू, हरभऱ्यास फायदेशीर

विदर्भात हा पाऊस सार्वत्रिक नाही. जिथे झाला आहे, तूर या खरीप आणि गहू, हरभरा अशा रब्बी पिकांना अपायकारक न राहता फायदेशीर ठरेल, असा अंदाज अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शिक्षण विस्तार संचालक डॉ. धनराज उंदिरवाडे यांनी दिला आहे.

हंगामी पिके

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषी मौसम सेवा विभागाचे मुख्य प्रकल्प डॉ. के. के. डाखोरे यांनी दिलेला सल्ला पुढीलप्रमाणे.

कापूस : वेचणीस तयार असलेल्या कापसाची वेचणी लवकरात लवकर करावी. सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

तूर : पाऊस झाल्यानंतर पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Skill Development: प्रशिक्षण द्या, कारागीर वाढवा; पैठणी कारागिरांनी मांडल्या अडचणी

Banana Crop Protection: केळीमधील चिलिंग इन्जुरी टाळण्यासाठी उपाय

Maize Procurement: मका खरेदी केंद्राअभावी कर्नाटकातील शेतकऱ्यांना फटका, व्यापाऱ्यांकडून भाव पाडून खरेदी, क्विंटलमागे ८०० रुपयांचे नुकसान

Agricultural Land Act: हैदराबाद कूळ वहिवाट आणि शेत जमीन अधिनियम

Maharashtra Politics: पुढच्यास ठेच मागचा शहाणा

SCROLL FOR NEXT