chili Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Chili Cultivation : मिरची उत्पादक शेतकऱ्यांना डहाणूमध्ये पीक संरक्षणाचे धडे

Crop Protection : कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी कीडनाशके वापरताना होणारे अपघात यावर उपाय आणि काळजी याबाबत माहिती दिली.

Team Agrowon

Palghar News : डहाणू तालुक्यातील निकणे या गावात मिरची उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘सुरक्षेचे महत्त्व’ यावर विशेष कार्यशाळा इन्सेक्टीसाइड इंडिया लिमिटेड या कीडनाशक उत्पादक कंपनीमार्फत घेण्यात आली होती. या कार्यशाळेमध्ये एकूण ५० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांनी कीडनाशके वापरताना होणारे अपघात यावर उपाय आणि काळजी याबाबत माहिती दिली.

तसेच सुरक्षा सूटचा वापर, हात मोजे, चश्मा, बूट इत्यादी साधने वापरल्याने फवारणी करताना आरोग्याची सुरक्षा कशी राखली जाते, हे प्रात्यक्षिक करवून दाखवले.

या वेळी कंपनीचे विक्री अधिकारी भूपेंद्र पाटील, कृषी सहाय्यक सचिन नाठे, निकणे गावच्या सरपंच सोनाली वनगा, तसेच प्रगतशील शेतकरी हरेश कोंब, सुधीर घाटाळ आणि बिरसा ॲग्रोटेक केंद्राचे संचालक रघुनाथ सुतार उपस्थित होते.

कीडनाशकांबाबत

कीडनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. हेक्टरी किती मात्रा वापरावी, विषबाधा झाली, तर काय करावे, असे अनेक उदाहरणे प्रा. सहाणे यांनी शेतकऱ्यांना दिली. मिरची शेतात जाऊन विविध किडी आणि रोगाची ओळख व त्यावर उपाय कसे करावे, याविषयी त्यां‍नी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT