Crop Loan Update  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : सलग पाचव्या वर्षी पीककर्जाचे उद्दिष्ट अपूर्ण

Objectives of Crop Loans : : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण २ हजार १२९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते.

Team Agrowon

Parbhani News : आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये परभणी जिल्ह्यातील १७ बँकांना खरीप आणि रब्बी हंगामात मिळून एकूण २ हजार १२९ कोटी रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट होते. परंतु ३१ मार्च अखेरपर्यंत प्रत्यक्षात १ लाख ६७ हजार ११८ शेतकऱ्यांना १ हजार ३३५ कोटी ३५ लाख रुपये (६२.७२ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले. त्यात खरिपातील ८३८ कोटी ४२ लाख रुपये (६०.५७ टक्के) टक्के आणि रब्बी तील ४९६ कोटी ९३ लाख रुपये (६६.७२ टक्के) पीककर्जाचा समावेश आहे.

जिल्ह्यात २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ या आर्थिक वर्षात वाटप करण्यात आलेल्या एकूण पीक कर्जाच्या रकमेत ४९३ कोटी ६० लाख रुपयांनी तर कर्ज मिळालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येत २२ हजार ११४ एवढी घट झाली आहे. जिल्ह्यातील बँकाना २०२३-२४ च्या खरीप हंगामात १ हजार ३८४ कोटी १७ लाख रुपये उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात १ लाख ४ हजार १५८ शेतकऱ्यांना ८३८ कोटी ४२ लाख रुपये (६०.५७ टक्के) पीककर्ज वाटप करण्यात आले.

खरिपात जिल्हा बँक व महाराष्ट्र्र ग्रामीण बँक या दोन बँकांनीच उद्दिष्टापेक्षा जास्त पीककर्जवाटप केले. त्यात जिल्हा सहकारी बँकेने १६४ कोटी ९३ लाख रुपये उद्दिष्ट असताना १८१ कोटी ६१ लाख रुपये (११०.११ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने २०९ कोटी ९४ लाख रुपये उद्दिष्ट असतांना २९१ कोटी ८२ लाख रुपये (१३९ टक्के) कर्ज वाटपाचा समावेश आहे. राष्टीय बँक व खासगी बँकांना उद्दिष्टपूर्ती करता आली नाही.

राष्ट्रीय (व्यापारी) बँकांनी ८९३ कोटी २६ लाख पैकी ३४३ कोटी १८ लाख रुपये (३८.४२ टक्के) तर खासगी बँकांनी ११६ कोटी ४ लाखांपैकी २१ कोटी ८१ लाख रुपये (१८.८० टक्के) पीककर्ज वाटप केले. २०२२-२३ च्या तुलनेत खरीप पीककर्ज वाटपात २ कोटी ७ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. रब्बी हंगामात ७४४ कोटी ४३ लाख रुपये उद्दिष्ट असतांना प्रत्यक्षात ६२ हजार ९६० शेतकऱ्यांना ४९६ कोटी ९३ लाख रुपये (६६.७२ टक्के) वाटप झाले.

रब्बीत २०२२-२३च्या तुलनेत १२० कोटी ५ लाख रुपयांनी घट झाली आहे. रब्बीत केवळ जिल्हा सहकारी बँकेने उद्दिष्ट पूर्ण केले. जिल्हा बँकेने १६१ कोटी ९१ लाख रुपये उद्दिष्ट असतांना १६४ कोटची ३७ लाख रुपये (१०१.५२ टक्के) पीककर्ज वाटप केले. राष्ट्रीय बँकांनी ४२२ कोटी ८ लाख रुपये पैकी असताना २८१ कोटी ४७ लाख रुपये (६६.६९ टक्के), महाराष्ट्र ग्रामीण बँकेने १०६ कोटी २१ लाख रुपये पैकी ३९ कोटी ६ लाख रुपये (३६.७८ टक्के) खासगी बँकांनी ५४ कोटी ६३ लाख पैकी १२ कोटी २ लाख (२२.०२ टक्के) पीककर्ज वाटप केले.

जिल्ह्यात २०१५-१६ आणि २०१६-१७ या वर्षी अनुक्रमे १०६ टक्के आणि १०८ टक्के पीककर्ज वाटप झाले होते. २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षांत पीककर्ज वाटपाचा आलेख चढता राहिला आहे. परंतु २०२३-२४ मध्ये पीककर्जाचा आलेख घसरला असून खरीप व रब्बी मिळून सरासरी ६२.७२ टक्के वाटप झाले.

तुलनात्मक पीककर्ज वाटप स्थिती (रक्कम कोटी रुपये)

वर्षे उद्दिष्ट रक्कम वाटप रक्कम टक्केवारी

२०१९-२० १७८४.०० ४२४.१६ २३.८३

२०२०-२१ २१०७.०७ १३५१.८० ६४.२०

२०२१-२२ १८२०.२० ११९१.९१ ६५.४८

२०२२-२३ १८२८.९५ १४५३.३३ ७९.४६

२०२३-२४ २१२९.९० १३३५.३५ ६२.७२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT