Crop Loan : शंभर संस्थांतील पीककर्ज वाटप थेट बँकेतून

Agriculture Credit Supply : जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायट्यांच्या माध्यमातून दरवर्षी पीककर्जाचे वाटप करते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेने सर्वाधिक पीककर्जाचे वाटप केले आहे.
Crop Loan
Crop Loan Agrowon
Published on
Updated on

Yawatmal News : जिल्ह्यात ४१४ सोसायटी आहेत. त्यातील शंभर सोसायट्यांकडे दोन कोटींपेक्षा जास्त अनिष्ट तफावत आहे. या संस्थेमार्फत पीक कर्जाचे वाटप न करता थेट बँकेतून शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले जाणार आहे. तसा निर्णय संचालक मंडळांच्या बैठकीत घेण्यात आला.

जिल्हा मध्यवर्ती बँक सोसायट्यांच्या माध्यमातून दरवर्षी पीककर्जाचे वाटप करते. गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा बँकेने सर्वाधिक पीककर्जाचे वाटप केले आहे. असे असतानाही वसुलीअभावी बँकेची स्थिती बेताची झाली आहे. पीक कर्जाच्या हिशेबातील तफावत हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.

Crop Loan
Crop Loan Recovery : शेतकऱ्यांच्या बचत खात्यांवरील निर्बंध उठवा

सोसायट्यांकडे असलेली अनिष्ट तफावतीची रक्कम हा कळीचा मुद्दा आहे. त्यातून बाहेर निघण्यासाठी बँकेने थेट पीककर्ज वाटपाचा पर्याय ठेवला होता. शुक्रवारी (ता.१२) नवीन पीककर्ज वाटप धोरणाबाबत संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत मधला मार्ग काढण्यात आला आहे.

Crop Loan
Kharip Crop Loan : शेतकऱ्यांना खरीप पीककर्जाची प्रतीक्षा

जिल्ह्यात ४१४ आदिवासी व ग्राम विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. त्यातील शंभर संस्थांकडे अनिष्ट तफावत दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या संस्थांमधील शेतकरी सभासदांना थेट बँकेमार्फत पीककर्ज वाटप केले जाणार आहे.

त्यामुळे संस्थेमार्फत होणारे वाटप यंदा होणार नाही. संबंधित सोसायट्यांमधील शेतकरी सभासदांना तशा सूचना दिल्या जाणार आहेत. उर्वरित सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा महत्त्वाचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला बँकेच्या ११ संचालकांसह मुख्य कार्यकारी अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com