Farm Loan Waiver Agrowon
ॲग्रो विशेष

Farm Loan Waiver: पीककर्ज वसुली पुन्हा तळ्यात-मळ्यात

Crop Loan Recovery: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जूनअखेर पीक कर्जाची वसुली मोहीम सुरू असताना माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची पीककर्ज माफीसाठी समिती नेमण्याचे जाहीर केले.

Team Agrowon

Sangali News: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून जूनअखेर पीक कर्जाची वसुली मोहीम सुरू असताना माजी आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांची पीककर्ज माफीसाठी समिती नेमण्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक कर्जे भरण्याबाबत पुन्हा तळ्यात-मळ्यात, अशी भूमिका घेतली आहे.

लोकसभा, विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर कर्जमाफी जाहीर केली. राज्यात भाजप महायुती सत्तेत आल्यानंतरही मार्चअखेरला अवघे तीन दिवस शिल्लक असताना अर्थमंत्र्यांनी कर्जे भरण्याचे आवाहन केले. सध्याच्या ‘कर्जमाफी’बाबत सरकार पुन्हा समिती नेमते आहे. कर्जमाफी येत्या १३ दिवसांत शक्य नाही.

कर्जमाफी मिळाली नाही, तर जुलैत शून्य टक्क्याच्या कर्जावर १२ टक्क्यांनी आकारणी आणि नव्याने कर्जे वितरणास शेतकरी अपात्र ठरतील. पीककर्ज वाटपात राज्यात, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा ८५ टक्के वाटा असतो. पीक कर्जे वसुलीत मार्चला फारसे अपेक्षित नसते. जूनमध्ये मात्र वसुलीसाठी जोरदार मोहीम राबवली जाते.

मार्च २०२५ अखेरीस अवघे तीन दिवस बाकी असताना अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात शेतकऱ्यांना पीक कर्जे तातडीने भरावीत, असे आवाहन करताना शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याएवढी आर्थिक परिस्थिती नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शेतकरी अवघ्या काही दिवसांत कर्जे भरायला सुरुवात करीत होते.

तोपर्यंत माजी आमदार बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन सुरू केल्यानंतर सरकारमधील मंत्रिमहोदयांनी, ‘कर्जमाफीचा विषय राज्य सरकारने सोडून दिला नाही. योग्य वेळ येताच कर्जमाफी दिली जाईल,’ असे जाहीर केले. त्यासाठी समिती नेमण्याचे जाहीर केले. त्यामुळे पीक कर्ज वसुलीवर पुन्हा परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्हा बॅंकेची जूनअखेर कर्जवसुली सुरू आहे. सध्या ६८ टक्के कर्जवसुली सुरू आहे. ९५ टक्क्यांचे उद्दिष्ट होते. कर्जवसुलीसाठी प्रयत्न कायम राहणार आहेत. कर्जमाफीबाबत सांगता येणार नाही. शेतीकर्जाची जून २०२५ अखेरची वसूलपात्र रक्कम २३७२ कोटी ३२ लाख रुपये आहे.
- शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बॅंक, सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer shortage : देशात खताचा साठा पुरेसा, केंद्र सरकारचा दावा; शेतकऱ्यांची मात्र खत टंचाईने कोंडी

Fruit Packaging: भारतीय फळनिहाय पॅकेजिंग पद्धती

Agriculture Minister: विद्यार्थी वसतिगृहाला कृषिमंत्र्याची अचानक भेट

Agriculture Land Document: महसूल, दिवाणी कोर्टासाठी फेरफार पत्रक

Citrus Farming: कागदी लिंबू हस्त बहराचे नियोजन

SCROLL FOR NEXT