Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांना ३७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर

Farmer Relief Maharashtra: खरीप हंगाम-२०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली.

Team Agrowon

Pune News: खरीप हंगाम-२०२४ मध्ये पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना एकूण ३ हजार ७२० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ९ मे पर्यंत ३ हजार १२६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. आणखी ३०७ कोटी रुपये शेतकऱ्यांना लगेच मिळणार आहेत. तर २८७ कोटी रुपये राज्य सरकारने पीकविमा कंपन्यांना विम्याचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत.

शेतकऱ्यांना सध्या खरीप हंगाम-२०२४ मधील वेगवेगळ्या ट्रीगरमधून भरपाई मंजूर करण्याचे काम सुरु आहे. राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून भरपाई जमा केली जात आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई राज्याने आपला दुसरा हप्ता विमा कंपन्यांना दिल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणीपश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या चार ट्रिगरमधून भरपाई मंजूर झाली आहे. शेतकऱ्यांना ९ एप्रिलपर्यंत ३ हजार ७२० कोटी रुपये भरपाई मंजूर करण्यात आली.

पण राज्याने केवळ पहिला हप्ता दिल्यामुळे नियमानुसार कंपन्या स्थानिक नैसर्गिक अपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाईच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करत आहेत. या दोन ट्रीगरमधून मंजूर भरपाई ३ हजार ४३३ कोटी रुपये आहे. त्यापैकी ९ एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार १२६ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर ३०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे.

चार जोखीम बाबींमधून मंजूर भरपाई

२७२० कोटी

स्थानिक आपत्ती

७१३ कोटी

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती

२७० कोटी

काढणी पश्चात नुकसान

१८ कोटी

पीक कापणी प्रयोग आधारित

वितरित नुकसान भरपाई

२४१८ कोटी

स्थानिक आपत्ती

७०८ कोटी

हंगामातील प्रतिकूल परिस्थिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Artificial Sand: कृत्रिम वाळू धोरणासाठी जिल्ह्यात आराखडा तयार

Reshim Udyog: रेशीम उद्योगासाठी ३.५ लाखांपर्यंत अनुदान; रेशीम व्यवस्थापन कसे करावे?

Solar Project: गुत्तीच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Dairy Farming: आदर्श गोठा पुरस्काराचा राज्यभरात आदर्श घ्यावा; पालकमंत्री आबिटकर

Water Allocation: हक्काचे उर्वरित १६ टीएमसी पाणी लवकरच मराठवाड्यात

SCROLL FOR NEXT