Marathwada Vima Bharpai: मराठवाड्यात १९६८ कोटी रुपये विमा भरपाई मंजूर; जिल्ह्यानिहाय अपडेट

Crop Insurance Payout: मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी १९६८ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यातील बहुतांश रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून उर्वरित भरपाई प्रक्रियेत आहे.
Vima Bharpai
Vima BharpaiAgrowon
Published on
Updated on

Pune News: मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी विमा भरपाई मंजूर झाली आहे. पीक विम्याची ३० एप्रिलपर्यंत १ हजार ९६८ कोटी रुपये भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १ हजार ६६७ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. तर उरलेले ३०१ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना भरपाई मंजूर झाली. यापैकी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन्ही ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. तर इतर जिल्ह्यांमध्ये केवळ स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून भरपाई मंजूर झाली. 

Vima Bharpai
Crop Insurance: पीक विम्याचा ‘फडणवीस पॅटर्न’ शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक: हर्षवर्धन सपकाळ

मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ३० एप्रिलपर्यंत एकूण १ हजार ९६८ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी १ हजार ६६७ कोटी रुपये जमा झाले. तर स्थानिक नैगर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून १ हजार २५५ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत ९६५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले. हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून ७१३ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ७०२ कोटी रुपये जमा झाले. 

छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ८५ कोटी १६ लाख रुपये भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत ८४ कोटी ५५ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. 

जालना
जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून १९७ कोटी रुपये भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत १०८ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले. तर ८९ कोटी रुपये जमा करण्याच प्रक्रिया सुरु आहे. 

Vima Bharpai
Revised Crop Insurance Scheme: शेतकऱ्यांनाच लावला चुना

बीड 
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८२ कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत २१२ कोटी रुपये खात्यात आले. तर ७० कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

लातूर
लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २२७ कोटींची भरपाई मंजूर आहे. त्यापैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात सर्व रक्कम जमा करण्यात आली. 

धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात २३१ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी २१२ कोटी रुपये ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांना देण्यात आले. तर १९ कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

नांदेड 
नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधून १०३ कोटी आणि अग्रिम भरपाईचे २५८ कोटी असे एकूण ३६१ कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे. त्यावैकी ३० एप्रिलपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २५४ कोटी रुपये जमा करण्यात आले. तर १०७ कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरु आहे. 

परभणी
परभणी जिल्ह्यात स्थानिक नैसर्गिक आपत्ती मधून १०३ कोटी रुपये आणि अग्रिम भरपाईचे २९९ कोटी रुपये असे एकूण ४०२ कोटी रुपये भरपाई मंजूर आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास सर्व रक्कम जमा झाली. 

हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३० एप्रिलपर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून २७ कोटी आणि अग्रिम भरपाईचे  १५४ कोटी रुपये मंजूर झाले. त्यापैकी १६६ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम सुरु आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com