Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Vidarbha : विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये ८१०० हेक्टरवर पीक नुकसान

कृषी विभागाने या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्‍त पंचनाम्याचे काम पूर्ण केले असून, ११ जिल्ह्यांत ८१०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : विदर्भात शुक्रवारपासून (ता. ७) काही भागात दोन दिवस, तर काही भागात तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने थैमान घातले. कृषी विभागाने या नुकसानीच्या पार्श्‍वभूमीवर संयुक्‍त पंचनाम्याचे काम पूर्ण केले असून, ११ जिल्ह्यांत ८१०० हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान नोंदविण्यात आले आहे.

शुक्रवार (ता. ७) राज्याच्या विविध भागांसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वारा, गारपीट व पाऊस झाला. यामुळे अनेक भागात कापणी केलेल्या गव्हाची नासाडी झाली. अमरावती जिल्ह्यात कांदा लागवडीखालील क्षेत्र आहे. त्यालाही अवकाळी पावसाचा फटका बसला.

संत्रा बागांमध्येही पाऊस, गारपिटीच्या परिणामी येत्या काळात फळगळीची समस्या निर्माण होण्याची भीती वर्तविली जात आहे.

सध्या झाडावर असलेली फळे गारपिटीमुळे डागाळली असून, त्याच्यावर येत्या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होत फळांची गळ होणार असल्याचे सांगितले जात आहे. विदर्भातील ११ जिल्ह्यांत पिकांचे नुकसान झाले असून, अमरावती विभागात सर्वाधिक ८०३६.२७ हेक्‍टरवर नुकसान नोंदविण्यात आले आहे.

नागपूर विभागातील पाच जिल्ह्यात केवळ १८८ हेक्‍टर नुकसान झाल्याची नोंद आहे. अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यात सर्वाधिक ५८५९ हेक्‍टर, बुलडाणा जिल्ह्यात ११७४ हेक्‍टर,अमरावती ९६१.०२, यवतमाळ २३.७०, तर वाशीम जिल्ह्यात सर्वात कमी १८.४८ हेक्‍टर पिकाच्या नुकसानीची माहिती आहे.

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील बाधित तालुके १७, तर बाधित गावांची संख्या ३५२ आहे. मका, गहू, कांदा, ज्वारी, हरभरा अशा पिकांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांपैकी गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक नुकसानीची नोंद घेण्यात आली. १३९ गावे, ४७४ शेतकरी आणि बाधित क्षेत्र १८८ हेक्‍टर इतके आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shetkari Karjmafi: वेळकाढूपणाचे प्रयोग

Farmer Loan Waiver: हातावर देऊन कोपरावर नका मारू

Vice Chancellor Post: कुलगुरुपदाच्या शर्यतीतून बाद करण्यासाठी चौकशीचे कुभांड

Agricultural Officers Issue : सहायक कृषी अधिकारी संघटनेचा सिम कार्ड स्वीकारण्यास नकार

Sugarcane Rate Protest: कोल्हापुरात अनेक ठिकाणी ऊसतोडणी रोखण्याचे प्रयत्न

SCROLL FOR NEXT