Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मॉन्सूनोत्तर पाऊस, गारपिटीत ७,८६३ हेक्टरवर पिके बाधित

Post Monsoon Rain : मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब यासारख्या फळपिकांसह भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यात २५ आणि २६ नोव्हेंबर रोजी झालेला मॉन्सूनोत्तर पाऊस आणि गारपिटीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील १३ तालुक्यांतील सुमारे ७ हजार ८६३ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहे.

त्यामुळे सुमारे ११ कोटी ३८ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा कृषी विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. या मॉन्सूनोत्तर पावसामुळे ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली.

मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, टोमॅटो, डाळिंब यासारख्या फळपिकांसह भात, कांदा, ज्वारी, बटाटा, मका, भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.

हे पंचनामे पूर्ण झाले असून, ११ तालुक्यांतील ७ हजार ८३६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी देशमुख यांच्याकडे दिला आहे. त्यानुसार या मॉन्सूनोत्तर पावसामुळे ४३३ गावांमधील १९ हजार ७२७ शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे.

सरकारी निकषांनुसार जिरायती पिकांना प्रति हेक्टरी १ हजार, बागायती पिकांना २ हजार तर फळपिकांसाठी अडीच हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. अहवालानुसार शेतकऱ्यांना ११ कोटी या ३८ लाख ७७ मदत मिळावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

हा अहवाल आता कृषी आयुक्तालयाद्वारे राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. या अहवालानुसार ३ हजार ३३२ हेक्टरवरील जिरायती पिकांचे, २ हजार ९८४ हेक्टरवरील बागायती पिकांचे, हजार ५४७. ११ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचे पंचमान्यांमधून समोर आले आहे.

तालुका --- क्षेत्र (हेक्टर) --- नुकसानीची रक्कम (रुपयांत)

भोर --- ६५.७ -- ५ लाख ५८ हजार ६२०

मुळशी --- १४१.०३ ---११ लाख ९८ हजार ७५५

मावळ --- १३६ --- ११ लाख ५६०००

हवेली --- ७८.३७ ---६ लाख ७२ हजार १७०

वेल्हा ---४२.२५ ---३लाख ५९ हजार १२५

जुन्नर --- १०५८.५१ ---१ कोटी ७०लाख ६४ हजार ७०५

शिरूर --२२७१.६५ ---३५ लाख २१ हजार १२५

आंबेगाव --३१६०.५१ --- ४ कोटी७ लाख ७९ हजार ४२५

खेड --- ३२७.२८ --- ३८ लाख ३७ हजार ४२५

बारामती --- ५०१.१० --- १ कोटी १२ लाख ०९ हजार ८५०

इंदापूर ---८१.२९ ---१ कोटी ८२ लाथ ९ हजार ०२५

एकूण -- ७८३७ --- ११ कोटी ३८ लाख ७६ हजार ६२५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT