Crop Damage : पाऊस, गारपिटीमुळे ३५ हजार हेक्टरवरील पिकांची दैना

Unseasonal Rain : द्राक्ष, कांदा पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मागील महिन्यात २६ व २७ नोव्हेंबर रोजी झालेल्या मॉन्सूनोत्तर पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांची दैना झाली आहे. ज्यामध्ये बागायती क्षेत्राला मोठा फटका बसला तर खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले. त्यात बहुवार्षिक फळ पिकांचे सर्वाधिक नुकसान आहे.

हजारो हेक्टरवरील पिकांचे अस्मानी संकटामुळे झालेले नुकसान भरून निघणारे नाही. कृषी विभागाने ३३ टक्क्यांवररील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे पूर्ण केले असून ३४ हजार ९५२ हेक्टरवर नुकसान झाले आहे. द्राक्ष, कांदा पिकाला मोठा फटका बसल्याने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.

वादळी वाऱ्यासह अवेळी पाऊस व गारपिटीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक नुकसान बहुवार्षिक फळ पिकात द्राक्ष पिकाचे आहे. यासह कांदा, गहू, भात, टोमॅटो, ऊस व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात या आपत्तीचा सर्वाधिक फटका निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. बोराच्या आकाराच्या गारा पडल्याने द्राक्ष बागेमध्ये अक्षरशः गारांचा खच असला होता. त्यामुळे द्राक्ष बागामध्ये होत्याचे नव्हते झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : मंत्रिमंडळ बांधावर ; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर

कृषी विभाग व महसूलच्या अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या अहवालास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी अंतिम मंजुरी दिली. जिल्ह्यात १ हजार ३१६ गावांमध्ये नुकसान असून ६५ हजार ८४९ शेतकरी बाधित आहेत.

२७ मार्च २०२३ च्या शासन निर्णयानुसार लागू करण्यात आलेल्या सुधारित दरांप्रमाणे हेक्टरी कोरडवाहू क्षेत्रासाठी ८५००, बागायत क्षेत्रासाठी १७,००० तर बहुवार्षिक फळपिके क्षेत्रासाठी २२५०० रुपये मदत असणार आहे. या मदतीसाठी ६२ कोटी ५४ लाख ९० हजारांचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे सादर केला आहे.

Crop Damage
Hailstrom Crop Damage : गारपिटीत सारे गमावले, आता नव्याने सुरुवात हाच पर्याय

कोरडवाहू पिकात भात, नागली, वरई, ज्वारी यांचे नुकसान अधिक आहे. तर मका, सोयाबीन व कापूस यांचेही नुकसान आहे. बागायत क्षेत्रावर कांदा पिकाचे नुकसान अधिक आहे. मका, गहू, टोमॅटो, भाजीपाला, ऊस, पपई यासह इतर भाजीपाला पिकांचे नुकसान आहे. तर बहुवार्षिक फळ पिकांमध्ये द्राक्षाचे नुकसान सर्वाधिक आहे.

यासह डाळिंब, पेरू, मोसंबी, आंबा, सीताफळ यांचेही नुकसान अधिक आहे. जिल्हा प्रशासनाने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांचा ३३ टक्क्यांवरील नुकसानीचा अंतिम अहवाल मंजूर केला आहे. कोरडवाहू पिकांमध्ये ४८८ गावांमध्ये ५ हजार ७९० हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. बागायती पिकाचे ३८८ गावात १४ हजार ५२६ शेतकऱ्यांचे नुकसान आहे. तर बहुवार्षिक फळपिकात ४४६ गावांत १४ हजार ६३८ शेतकरी बाधित आहेत. राज्य शासन यावर काय निर्णय घेते, याकडे जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नुकसान असे

क्षेत्र प्रकार बाधित गावे बाधित शेतकरी बाधित क्षेत्र(हेक्टर) अपेक्षित निधी(लाख)

कोरडवाहू पिके ४८८ ११,३०० ५,७९०.२३ ४९२.२९

बागायती पिके ३८२ २९,८३६ १४,५२३.५९ २,४६९.०१

बहुवार्षिक फळपिके ४४६ २४,७१३ १४,६३८.२१ ३,२९३.६०

एकूण १,३१६ ६५,८४९ ३४,९५२.०३ ६,२५४.९०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com