Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नांदेडला ‘मॉन्सुनोत्तर’ने पिकांची दाणादाण

Unseasonal Rain : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी पिकांसह फळपीक, तूर, कपाशी या पिकांनी दाणादाण उडाली आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यात सलग तीन दिवसांपासून होत असलेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे रब्बी पिकांसह फळपीक, तूर, कपाशी या पिकांनी दाणादाण उडाली आहे. पावसाचे प्रमाण अधिक असलेल्या लोहा तालुक्यातील माळाकोळी, मुखेडमधील मुखेड व चांडोळा या महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. बुधवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी २०.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नांदेड जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून मॉन्सूनोत्तर पावसाने धुमाकूळ घातला आहे. सोमवारी झालेल्या जोरदार पावसानंतर मंगळवारी पुन्हा दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. हा पाऊस जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यांत झाला.

या पावसाचे प्रमाण लोहा, मुखेड, बिलोली, देगलूर, कंधार, नायगाव, माहूर, मुदखेड, भोकर या तालुक्यांत सर्वाधिक होते. हा पाऊस लोहा तालुक्यातील माळाकोळी मंडलात ७९.८० मिलिमीटर, मुखेडमधील मुखेड मंडलांत ७४.८० व चांडोळा महसूल मंडलात ७०.८० मिलिमीटर नोंद झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली.

यासोबतच रामतीर्थ मंडलात ६३, बिलोली ५६.८०, आदमपूर ५४.८०, शाहापूर ५२.५०, सिंदखेड ४५.८०, वाई ४३, देगलूर ४२.३०, कंधार ४२, खानापूर ४१, नरंगल ४०, अर्धापूर ३८, लोहगाव ३८, नरसी ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, या पावसामुळे खरिपातील तूर, कपाशी या पिकांसह रब्बीतील हरभरा, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. तर अर्धापूर तालुक्यातील पांगरी येथील फळांनी लगडलेली पपईची झाले आडवी पडली आहेत.

यासोबतच अर्धापूर तालुक्यातील भोसी शिवारात गारांचा पाऊसही झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे रब्बी पेरणीसाठी तयार असलेल्या शेतकऱ्यांना आणखी काही दिवस थांबावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज; राज्याच्या बहुतांशी भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Drip Irrigation: सूक्ष्म सिंचनच्या प्रस्तावांना पूर्वसंमतीची प्रतीक्षा

Solar Energy: वार्षिक दहा लाख युनिट वीजनिर्मितीचा सौर ऊर्जा प्रकल्प

Farmers Market: खानदेशात शेतकरी बाजार केव्हा सुरू होणार

Ancient Farming: शेतीच्या उगमाच्या सिद्धांताला ९२०० वर्षांपूर्वीच्या गुहांचे आव्हान

SCROLL FOR NEXT