Jalna News : तालुक्यातील हजारो शेतकरी अद्यापही मागील वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत. येत्या १० दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण होणार नाही, तोपर्यंत तहसील कार्यालय शेतकरी सोडणार नाहीत,’’ असा इशारा बळीराजा फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दिला.
तालुक्यात दुष्काळ असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. हजारो शेतकरी अद्यापही मागील वर्षीच्या खरीप हंगामातील अतिवृष्टीच्या व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानापासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या कार्यालयात व बँकामध्ये चकरा मारायच्या तरी कितीवेळा? अनेकदा कागदपत्रांची पूर्तता करून देखील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे.
शेतकऱ्यांच्या इतर प्रमुख मागण्या
शेतकरी सन्मान व ‘नमो’ योजनेत येणाऱ्या अडचणी तत्काळ सोडविण्यासाठी तहसीलदारांनी पुढाकार घ्यावा
राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जमा झालेल्या अनुदानाच्या खात्याचा होल्ड काढावा
भोकरदन तालुक्यात कोरड्या दुष्काळाच्या उपाययोजना लागू कराव्यात
चालू वर्षाची पीकविम्याची अग्रिम व १०० टक्के पीकविमा भरपाई मिळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत
दुधाचे दर वाढवावेत, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफ करावे.
जमीन महसूल माफी, पीक कर्जमाफी, चारा छावण्या सुरू कराव्यात
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.