Wild Boar Agrowon
ॲग्रो विशेष

Wild Boar Rampage : रानडुकरांचा धुमाकूळ, पिकांचे नुकसान

Crop Damage : या क्षेत्रात रानडुकरे धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान करत आहेत. नेहमीच्या अशा प्रकारामुळे आता बागायती शेतकरी भाजीपाला उत्पादन घेणेच सोडून देत आहेत.

Team Agrowon

Dahanu News : तालुक्याच्या किनारपट्टी भागातील गावांमध्ये शेतकऱ्यांनी बागायत क्षेत्रात भाजीपाला, रताळे, सुरणासारखी कंदमुळे, मिरची, ढोबळी मिरची, कोबी आदींची लागवड केली आहे. मात्र, या क्षेत्रात रानडुकरे धुमाकूळ घालून प्रचंड नुकसान करत आहेत. नेहमीच्या अशा प्रकारामुळे आता बागायती शेतकरी भाजीपाला उत्पादन घेणेच सोडून देत आहेत.

किनारपट्टी भागातील वाढवण, वासगाव, वरोर, बाडापोखरण, ओसारवाडी गावातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात बागायती शेतीत रताळी, अळू, नवलकोल, मिरची, ढोबळी मिरची, कोबी आणि इतर प्रकारच्या भाजीपाल्यांची लागवड महागडी बियाणे, खते, रासायनिक औषधे आणि सोसायटीची तसेच बँकांकडून कर्ज घेऊन केली आहेत.

ही लागवड यावर्षी पाऊस लांबल्याने मागे पडली. मात्र, रात्रीच्या वेळी लागवड केलेल्या शेतात रानडुकरे धुमाकूळ घालून पिकांची नासाडी करत आहेत. मिरची, ढोबळी मिरची, कोबीसारख्या शेतीचे प्रचंड नुकसान करत आहेत.

बागायती शेतात रब्बी हंगामात महागडी बियाणे, औषधे आणि सोसायटी व बँकांकडून कर्ज घेऊन मिरची पिकाबरोबरच रताळी, सुरण, नवलकोलची लागवड केली आहे. मात्र, ही पिके रात्रीच्या वेळी रानडुकरे फस्त करून प्रचंड नुकसान करत आहेत. पुन्हा लागवड करणे शक्य नसल्याने शेती सोडून देण्याचा निर्णय घेतला आहे.
- अनंत पाटील, बागायतदार, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT