Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Post Monsoon Rain : शहादा तालुक्यात ‘मॉन्सुनोत्तर’चे थैमान

Team Agrowon

Latest Agriculture News : काकर्दे खुर्द, काकर्दे दिगर, हिंगणी, तोरखेडा, अभाणपूर, कोंढावळ, खापरखेडा (ता. शहादा) परिसरास गुरुवारी (ता. ३०) रात्री नऊच्या सुमारास विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह सोसाट्याचा वारा तसेच ढगफुटीसदृश मुसळधार अवकाळी पावसासोबत जोरदार वादळी वाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकरातील फळबागांचे नुकसान झाले.

खासकरून केळी, पपई, हरभरा, टोमॅटो, डांगरमळ्यांचे मोठे नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. महसूल व कृषी विभागाने परिसरातील शेत शिवारात नुकसानीचे पंचनामे सुरू केले आहेत.

शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर, काकर्दे खुर्द, हिंगणी, तोरखेडा, अभणपूर, खापरखेडा, कोंढावळ परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा सुमारे अर्धा तास पाऊस झाला. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी, पपई अक्षरशः आडवी पडली असून, लागलेली फळे जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.तर डांगरमळे, हरभरा, भाजीपाला आदीसह शेती पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे.

या पावसाने आधीच दुष्काळाने कंबरडे मोडलं आणि अवकाळीने रडवलं अशी गत झाली आहे. यामुळे बळीराजा पुन्हा नैसर्गिक व आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी व महसूल विभागाने निकष न लावता सरसकट पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसामुळे केळी, पपई पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे परिसरात शेकडो एकर पपई जमीनदोस्त झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. तो मिळावा तसेच महसूल व कृषी विभागाने पंचनामे सरसकट करावेत व नुकसानभरपाई द्यावी.– बापू मराठे, शेतकरी, काकर्दे खुर्द

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT