Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Nagar Heavy Rain : नगर जिल्ह्यात वादळी पाऊस, गारपिटीचा तडाखा

Crop Damage : नगर जिल्‍ह्यात रविवारी (ता. २६) दुपारनंतर तसेच रात्री उशिरा झालेल्या जोरदार पाऊस, वादळ व गारपिटीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. सर्वाधिक फटका पारनेर तालुक्याला बसला आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्‍ह्यात रविवारी (ता. २६) दुपारनंतर तसेच रात्री उशिरा झालेल्या जोरदार पाऊस, वादळ व गारपिटीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उध्वस्त केले आहे. सर्वाधिक फटका पारनेर तालुक्याला बसला आहे. कोट्यवधी रुपयांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

नगर, कोपरगाव, अकोले, संगमनेर, शेवगाव, राहुरी, राहाता, श्रीगोंदा, नेवासा तालुक्यांतही वादळी पाऊस झाला. जिल्ह्यात सुमारे ७० मंडलांत पावसाने हजेरी लावली. नऊ मंडलांत अतिवृष्टी तर ४३ मंडलांत जोरदार पाऊस झाला. नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

जिल्ह्यात रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी साडेचार वाजता अचानक वादळी पाऊस, गारपीट झाली. पारनेर तालुक्याला वादळ आणि गारपिटीचा अधिक फटका बसला. पानोली, सांगवी सूर्या, जवळा, निघोज, करंदी, वडझिरे, चिंचोली, हंगा, वडनेर हवेली, राळेगण थेरपाळ, पिंपळनेर, गुणोरे, गांजी भोयरे, पारनेर

या ठिकाणी जोरदार गारपिटीसह व वादळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी फळबागा तसेच ज्वारी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले. पिंपरी जलसेन, पानोली, निघोज, राळेगण थेरपाळ आदी गावांसह परिसरात जोरदार गारांसह पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारांचा खच पडला.

संगमनेर तालुक्यातील घारगाव, तळेगाव दिघे परिसरात वादळी पाऊस झाला. काही भागात गारा पडल्या. या पावसाचा गहू, हरभरा, कांदे,भाजीपाला या पिकांसह डाळिंब, द्राक्षे आदी फळबागांना फटका बसला. अकोले तालुक्यात भातपिकांची झोडपणी करण्याऱ्या शेतकऱ्यांची मोठी धावपळ झाली. राजूर, माळेगाव, रंधा, बारी, कोतूळ परिसरात शेतकरी भात कापणी व खळ्यावर झोडणीचे काम करताना त्यांची धावपळ उडाली.

४३ मंडलांत वादळी पाऊस

जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) सकाळपर्यंत निघोज, भातकुडगाव, कुकाणा, सलाबतपूर, देवळाली, आश्वी, शिबलापूर, तळेगाव, पोहेगाव या नऊ मंडलांत ६५ मिलिमीटरपेक्षा अधिक म्हणजे अतिवृष्टी झाली आहे. शिवाय, नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, भाळवणी, वडझिरे, पळशी, देवदैठण, बोधेगाव, चापडगाव, ढोरजळगाव, एरंडगाव,

माणिकदौंडी, कोरडगाव, करंजी, मिरी, नेवासा बुद्रूक, वडाळा, सात्रळ, ताहराबाद, टाकळीमिया, धांदरळफळ, समनापूर, घारगाव, डोळासणे, साकूर, पिंपरणे, वीरगाव, समशेरपूर, साकिरवाडी, राजूर, शेंडी, कोतुळ, ब्राह्मणवाडा, रवंदे, सुरेगाव, दहिगाव, बेलापूर, उंदीरगाव, टाकळीभान, शिर्डी, लोणी, बाभळेश्वर, पुणतांबा अशा ४३ मंडलांत वादळी पाऊस व बहुतांश भागात गारपीट झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT