Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : मराठवाड्यात पावसाने केली दाणादाण

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या तीनही जिल्ह्यात रविवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासात पावसाने चांगलीच दानादाण केली. शेतशिवारीतील काढणीला आलेल्या पिकाची वाताहत झाली. वेचणीला आलेल्या कापसाच्या वाती झाल्या. अनेक भागात सातत्याने येत असलेल्या या पावसाने फुटलेल्या कापसाला कोंब फुटणेही सुरू झाले आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासात सरासरी ४५.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात सरासरी ७१.१ मिलिमीटर तर छत्रपती संभाजीनगर तालुक्यात सरासरी ६८.१ मिलिमीटर इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली.

पैठण तालुक्यात सरासरी २९.१ मिलिमीटर, गंगापूरमध्ये ४३.२ मिलिमीटर, वैजापूरमध्ये ३६.६ मिलिमीटर, कन्नडमध्ये ४५.७ मिलिमीटर, सोयगावमध्ये ४५.६ मिलिमीटर तर फुलंब्री तालुक्यात सरासरी ३७.२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. जालना जिल्ह्यातून सरासरी ४४.८ मिलिमीटर पाऊस झाला.

त्यामध्ये सर्वाधिक सरासरी ६२.२ मिलिमीटर पाऊस जालना तालुक्यात नोंदविला गेला. त्यापाठोपाठ परतुर तालुक्यात सरासरी ५६.२ मिलिमीटर, मंठा ५५.६, भोकरदन ४०.५, घनसावंगी ३९.८, बदनापूर ३७.६, अंबड ३४.३ तर जाफराबाद तालुक्यात सरासरी ३२.५ मिलिमीटर पाऊस झाला. बीड जिल्ह्यात सरासरी १२.६ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील पाटोदा, घाटनांदुर, बर्दापूर, दासखेड, धर्मापुरी, मोहखेड, पाली आदी मंडळ वगळता मंडलात तुरळक, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला.

जिल्हानिहाय पाऊस (मिलिमीटरमध्ये)

छत्रपती संभाजीनगर जिल्हा

छत्रपती संभाजीनगर ६१, भावसिंगपुरा ५९, कांचनवाडी ४५.८, चित्तेपिंपळगाव ३९.५, करमाड ४६, लाडसावंगी ५८.३, चौका ६३, कचनेर ५३.३, पंढरपूर ५३.५, आडुळ ३७, पिंपळवाडी ४५.८, बालानगर २४.८, लोहगाव ४२.८, ढोरकीन ३६.८, बिडकीन ३६, पाचोड २८.५, विहामांडवा २५.५, निलजगाव ३२, गंगापूर २४.५, मांजरी २६, भेंडाळा ३१, शेंदूरवादा ५८, तुर्काबाद ४८.३, वाळूज ४१.५, हरसुल ५५.३, डोणगाव ६२.५, सिद्धनाथ वडगाव ४८, आसेगाव ६३.३, गाजगाव ४८, वैजापूर ४०.५, खंडाळा ३०.३, शिवूर ४१.८, बोरसर ४१.८, लासुरगाव ६१.५, महालगाव ४४.३, नागमठाण २८.३, लाडगाव २३.३, घायगाव २२.५, जानेफळ २५.८, बाबतारा २६.८, चिकलठाणा ३४.८, नाचनवेल ५२.३, नागद २९.५, बाजार सावंगी ५३.५, सिल्लोड २०, गोळेगाव ३८, अजिंठा २९.८, आमठाणा ५६, अंभई ३१.८, पालोद ४५.३, शिवना ५७, उंडणगाव ३८, सोयगाव ५४.८, सावलदबारा २६.८, जरंडी ३१.८, आळंद २५.५, पिरबावडा २७.३, वडोदबाजार ३४.३, बाबरा २६.

जालना जिल्हा

भोकरदन ५४.३, सिपोरा ५४.३, धावडा ३२.५, अनवा ४४, पिंपळगाव रेणुकाई ४४.३, हसनाबाद २५, राजूर ३०.८, केदारखेडा ३८.५, जाफराबाद ४२, माहोरा ६०.३, कुंभारझरी १५.३, टेंभुर्णी ३२.५, वरुड बुद्रुक १२.५, जालना शहर ६३.८, वाघरूळ १९.५, नेर ५७.५, शेवली ५६.८, अंबड ५५.५, धनगर पिंपरी ६०.५, जामखेड ३३.३, रोहिलागड २८.८, गोंदी १८.५, वडीगोद्री २५.५, सुखापुरी १७.८, आष्टी १६.८, श्रीष्टी ४२.५, सातोना ५४.३, बदनापूर ३१.८, दाभाडी २५, बावणे पांगरी ३१.५, रोशनगाव ३१.८, घनसावंगी २५.८, कुंभार पिंपळगाव १४.८, आंतरवाली टेंभी १२.३, जामसमर्थ १२, मंठा ४७.५, तळणी ४९, ढोकसाळ ६०.५.

बीड जिल्हा

पाली ३१.३, म्हाळसाजवळा १०.५, राजूरी नवगण १०.८, चौसाळा १६, पाटोदा ४२.३, दासखेड २७.५, थेरला १९.८, गेवराई २२.३ ,जातेगाव १३, धोंडराई १७.५, उमापूर १३.३, चकलांबा १५.३, सिरसदेवी १४.३, रेवकी ११.८, गंगामसला १५.३, तालखेड १८, नित्रुड १३.५, अंबाजोगाई १५.३, पाटोदा (म) २५, लोखंडी सावरगाव १८, घाटनांदुर ५५, बर्दापूर ४७, हनुमंत पिंपरी १६.५, सारोळा २०.३ , परळी १४, धर्मापुरी २८.३, नागापूर ११.३, सिरसाळा १०, मोहखेड ३७.३, तेलगाव १२, रायमोहा १९.३.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Claim : विम्यासाठी योग्य नुकसानीच्या पूर्वसूचना कशा द्यायच्या? योग्य पर्याय कसे निवडायचे?

Samruddhi Train : शेतीमाल पार्सलसाठी शेतकऱ्यांची गर्दी

Soybean Procurement : सोयाबीनमधील ओलाव्यामुळे हमीभावाने खरेदीसाठी अडचणी

Crop Insurance : शेतकऱ्यांना विक्रमी पीकविमा

Heavy Rain : परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील चार मंडलांत अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT