Paddy Crop Damage
Paddy Crop DamageAgrowon

Paddy Crop Damage : मुळशी तालुक्यात पावसाने भातपिकाचे मोठे नुकसान

Heavy Rain Crop Loss : मुठा खोरे, उरवडे, घोटावडे, पिरंगुट परिसरात हा पाऊस झाला. त्यामुळे खाचरे तुडुंब भरली. दसरा सणापासून शेतकरी भात काढणीस सुरवात करतात.
Published on

Pune News : मुळशी तालुक्याला शनिवारी (ता. १९) दुपारी तीन वाजल्यापासून परतीच्या पावसाने तुफान झोडपले. त्यामुळे काढणीस आलेल्या भातपिकाचे नुकसान झाले. तालुक्यातील मुठा खोरे, उरवडे, घोटावडे, पिरंगुट परिसरात हा पाऊस झाला.

त्यामुळे खाचरे तुडुंब भरली. दसरा सणापासून शेतकरी भात काढणीस सुरवात करतात. दरम्यान गेली पंधरा दिवस ढगाळ वातावरण, तुरळक पावसामुळे शेतकऱ्यांनी भात काढणीस सुरवात केली नाही.

Paddy Crop Damage
Paddy Crop : रायगड जिल्ह्यातील भातपिकावर संक्रांत

त्यातच उभ्या पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोग गेला. लोंब्यातील भरत असलेले दाण्यांची पळंज होऊ लागली. हा रोग तालुक्यात सर्वत्र पसरू लागला आहे.

Paddy Crop Damage
Paddy Crop Damage : पावसामुळे तळामध्ये भात जमीनदोस्त

शासनाकडून पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली. अशी परिस्थिती असताना परतीच्या पावसाने अधिकच नुकसान केले. खाचरे तुंबल्यामुळे आठ दिवस भात काढणी करता येणार नाही.

लोंब्याचे दाणे गळून पडतील. यावर्षी भाताचे पीक चांगले होते. . त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती फार काही उत्पन्न लागणार नाही. शासनाने सर्व भात शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com