Crop Damage In Nagar Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage In Nagar : श्रीगोंद्यात गारपिटीमुळे पिकांचे नुकसान

गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात वादळी पावसामुळे ५६८ शेतकऱ्यांच्या ३२१.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Team Agrowon

Nagar Agriculture News : गेल्या काही दिवसापासून श्रीगोंदा तालुक्यात वादळी पावसामुळे ५६८ शेतकऱ्यांच्या ३२१.५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान (Crop Damage) झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सर्वाधिक फटका फळबागांना बसला असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

तीन दिवसांपासून तालुक्याला वाचविणारा अवकाळी शनिवारी धडकलाच. तालुक्यातील श्रीगोंदे शहर, पारगाव, खेतमाळीसवाडी, आढळगाव, देऊळगाव, घुगलवडगाव, वलघुड, कामठी, बेलवंडी कोठार, वडाळी, भानगाव व टाकळी कडेवळीत या बारा गावांना वादळी वारे आणि अवकाळी पावसाचा फटका बसला.

यामध्ये ६४ शेतकऱ्यांच्या ४१.५० हेक्टर क्षेत्रावरील बागायती पिकांचे नुकसान झाले. ३९ शेतकऱ्यांच्या २५.६० हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

तर ४६५ शेतकऱ्यांच्या २५४.४० हेक्टर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाले. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव, घोटवी, आढळगाव या गावांमध्ये गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सध्या कांद्याची काढणी सुरू असल्याने काही शेतकऱ्यांनी शेतात कांदा काढून ठेवला आहे. मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांचा काढून ठेवलेला कांदा शेतातच भिजला. शिवाय सुरक्षित जागी काढून ठेवलेला कांदाही खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार ३२१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान आहे. शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून पंचनामे व कागदपत्रांसाठी मदत करावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT