Crop Damage Survey Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत द्यावी

Kisan Sangh Demand : शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

Team Agrowon

Nagar News : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे काढणीला आलेले मूग, उडीद, मटकी व इतर कडधान्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इतर पिकांनाही पावसाचा फटका बसला असून शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

भारतीय किसान संघाने मुख्यमंत्री व इतरांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही ठिकाणी तर पिके पूर्णतः जमीनदोस्त झाली आहेत. जमिनी खरडून गेल्या आहेत. सोयाबीन, कपाशी, तूर, मका, मोसंबीच्या बागा, भाजीपाला पिकांत पाणी साचल्याने मोठी हानी झाली आहे.

पिकांची मुळे सडून पीक हातचे गेले आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा उतरला आहे, परंतु विमा कंपनी प्रतिनिधी वेळेवर पंचनामा नुकसान पाहणीस येत नाहीत. सामान्य शेतकऱ्याला ऑनलाइन तक्रार करणे, माहिती कळवणे आदी विषयांची माहिती नसते. त्या तांत्रिक मुद्द्यावर बोट ठेवून कंपन्या नुकसान भरपाई देण्याच्या जबाबदारीपासून पळ काढतात.

त्यामुळे आपल्या पातळीवर तत्काळ सर्वत्र पंचनाम्याचे आदेश द्यावेत. मंडळ स्तरावर पर्जन्यमापकाच्या नोंदी या आधारभूत मानू नयेत. कारण अतिवृष्टी एका गावात होते, तर शेजारच्या गावात होत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे पर्जन्यमापकाच्या स्थानी पाऊस पडला नसेल तर नजीकच्या भागात १५-२० किमी अंतरावरील गावात पडलेल्या पावसाची नोंद नसते.

त्यामुळे हे शेतकरी भरपाई पासून वंचित राहतात. तरी सर्वत्र नुकसानीची नजर पाहणी करून पंचनामे करावेत. कोणालाही वंचित ठेवले जाऊ नये. शासन स्तरावर आवश्यक ते निर्णय घेऊन आदेश निर्गमित करावेत. कोणत्याही तांत्रिक कारणामुळे शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जावी. शेतातील हाता-तोंडाला आलेले पीक गेल्यामुळे हतबल शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी सरकारने प्रयत्न करावे, अशी मागणी भारतीय किसान संघाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT