Mango Crop Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Farming : रायगडमध्ये आंब्याचा मोहर धोक्यात

Mango Blossom : सातत्याने वातावरणात बदल, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अति थंडीचा विपरीत परिणाम आंब्याच्या मोहरावर होताना दिसत आहे.

Team Agrowon

Raigad News : सातत्याने वातावरणात बदल, काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अति थंडीचा विपरीत परिणाम आंब्याच्या मोहरावर होताना दिसत आहे. आंबापिकाला मोहर आल्यापासून ते फळधारणा आणि काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून कीटकशास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाने सहकाऱ्यांसह आंबा मोहर संरक्षण आणि व्यवस्थापनाबाबतचे मार्गदर्शन फळबागेत जाऊन शेतकऱ्यांना करत आहेत.

पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात भातपीक, रब्बीमध्ये मिरची पिकासह कडधान्यांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात चिकूच्या बागा आहेत. जिल्ह्यातील प्रमुख पिकांसह सध्या शेतकरी आंबा फळबाग लागवडीकडे वळत आहे.

किनारपट्टी भागासह जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड या तालुक्यात आंबा लागवड केली जाते. सध्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यात कडाक्याची थंडी जाणवत आहे. याचा परिणाम आंब्याच्या मोहरावर होत आहे. या दरम्यान विविध समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबा मोहर संरक्षण आणि त्याच्या व्यवस्थापनाबाबत किटकशास्त्रज्ञ प्रा. सहाने फळबागेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत आहेत.

फवारणीचे नियोजन असावे

पहिली फवारणी पोपटी रंगाच्या पालवीवर मोहर येण्यापूर्वी डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ९ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात करावी.

दुसरी फवारणी बोंगे फुटताना लॅमडासायलोथ्रीन ६ मिलि प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात करावी.

तिसरी फवारणी दुसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने करावी. इमिडाक्लोपीड १७.८ टक्के प्रवाही ३ मिलि प्रति १० लिटर पाणी किंवा बुप्रोफेजिन २५ टक्के, प्रवाही २० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

चौथी फवारणी तिसऱ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने थायोमेथॉगझाम २५ टक्के १० लिटर पाण्यासाठी एक ग्राम या प्रमाणात फवारावे.

पाचवी फवारणी चौथ्या फवारणीनंतर १५ दिवसांच्या अंतराने डायमेथोएट ३० टक्के प्रवाही १० मिली प्रति १० लिटर पाणी आणि लॅमडासायलोथ्रीन ५ टक्के ६ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.

किडी व रोगांचे नियोजन

तुडतुडे : डेल्टामेथरीन २.८ टक्के प्रवाही ९ मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पावसाळ्यानंतर कोवळ्या फुटीवर येणाऱ्या तुडतुड्यापासून संरक्षण होते. एझाडिरेक्टइन १००० पीपीएम ३० मिली किंवा वर्टीसिलीम लिकाणी ५० मिली प्रति १० लिटर पाण्यातून वापरावे.

भुरी : भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी प्राधान्याने पाच टक्के हेक्‍झाकोन्याझोल पाच मिली किंवा पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम; तसेच ढगाळ पावसाळी वातावरण असल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बनडाझिम १२ टक्के आणि मॅन्कोझेप ६३ टक्के १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वापरावे.

फुलकिडी : फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास २.५ मिली स्पिनोसाड ४५ टक्के प्रवाही किंवा थायोमेथॉक्साम २५ टक्के दोन ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारणी करावी. बागेत निळ्या रंगाचे चिकट सापळे लावावेत.

फळमाशी : फळमाशी फळाच्या सालीच्या आत अंडी घालते. अंड्यापासून तयार झालेली अळी फळाचा गर खाते. अशी फळे बाहेरून कुजल्यासारखी दिसतात आणि आत पांढऱ्या रंगाच्या अळ्या तयार होतात. फळांना बाजारमूल्य मिळत नसल्यामुळे मोठे नुकसान होते. एक एकर बागेत मिथाईल युजेनॉलयुक्त चार रक्षक सापळे लावावेत.

फळगळ थांबून योग्य वाढ होण्यासाठी

फळे वाटाणा, सुपारी आणि अंडाकृती असताना एक टक्का पोटॅशियम नायट्रेटच्या तीन फवारण्या घ्याव्यात. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची अर्धा टक्क्याने फवारणी करावी.

फळे अंडाकृती झाल्यावर आणि कोयी तयार होण्याच्या अवस्थेत असताना दोन टक्के युरिया आणि एक टक्का म्युरेट ऑफ पोटॅशची फवारणी करावी, यामुळे फळांचा आकार वाढवून तजेलदार आकर्षक रंग येतो.

देशी गाईचे गोमूत्र दहा टक्के प्रमाणात तीन वेळा फवारावे, यामुळे फळगळ थांबते.

फलधारणा झाल्यावर पंधरा दिवसांच्या अंतराने तीन-चार वेळा पाणी द्यावे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Rainfall : नांदेड जिल्ह्यात आजवर १८४ मिलिमीटर पावसाची तूट

South Solapur Water Crisis : उशाशी भीमा-सीना नद्या असूनही दक्षिण सोलापूर कोरडा ठणठण

Soybean Crop Damage: शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न करपले

Jalna Zilla Parishad Schools: पुढील दोन वर्षांत ५०० जिल्हा परिषद शाळांचा विकास करा : पालकमंत्री पंकजा मुंडे

Sangli DCC Bank: सांगली जिल्हा बँक निवडणुकीसाठी २४४५ मतदार

SCROLL FOR NEXT