Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : समृद्धी महामार्गावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा

Team Agrowon

Nashik News : निळवंडे धरणाच्या आवर्तनाचे पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रातील गावांना नदी मार्गाने मिळावे, या मागणीसाठी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर शनिवारी (ता. ९) रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या सुमारे १०० आंदोलक शेतकऱ्यांविरोधात वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

समृद्धी महामार्गावर निळवंडे आवर्तनाचे पाणी सिन्नर तालुक्यातील लाभक्षेत्रात येणाऱ्या मलढोन, सायाळे, पाथरे खुर्द व बुद्रुक, वारेगाव या गावांसाठी, संगमनेर तालुक्यातील देवकवठे, कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर या गावांसाठी पुन्हा सोडावे या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते.

मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे तासभर शेतकऱ्यांनी रोखून धरली होती.पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पारस वाघमोडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणखी गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही कारवाईला सामोरे जाऊ. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या आंदोलनाची केवळ एकच बाजू पाहिली. पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांशी तुच्छतेने वागले. त्याचा जाब पुढील काळात विचारला जाईल. धरणात पाणी असूनही आमच्या हक्काचे पाणी मिळत नव्हते, म्हणून रस्त्यावर उतरलो. पुढील काळात हक्काच्या पाण्यासाठी मोठ्या स्वरूपाची आंदोलने करण्यात येतील.
भागवत आरोटे, माजी नगरसेवक, नाशिक मनपा तथा भूमिपुत्र देवकवठे
निळवंडे कालव्याला पाणी सोडले म्हणून अकोले तालुक्यातील शेती खराब होते असे धूळफेक करणारे उत्तर जलसंपदाच्या अधिकाऱ्यांनी दिले. आवर्तन थांबवायचे होते तर ते थेट धरणातून थांबवायला हवे होते. मात्र तसे न करता सिन्नरच्या वाट्याचे पाणी राहता तालुक्यात वळवण्यात आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या संगमनेर कार्यालयात तसेच सिन्नर तहसीलदारांना लेखी निवेदन दिल्यानंतरच शेतकऱ्यांनी समृद्धीवर आंदोलन केले. जलसंपदा विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांची व शासनाचीदेखील दिशाभूल करत आहेत. आंदोलकांवर गुन्हे दाखल करून त्यांनी त्यांचे काम केले. आता हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी जिवाचे रान करतील.
- डॉ. विजय शिंदे, सायाळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Warehouse : गोदामाच्या रचनेनुसार उंचीचे नियोजन

Serious Issues of Rape : लैंगिकतेचे शमन की दमन?

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

SCROLL FOR NEXT