Swabhimani protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Raju Shetti vs Jayant Patil : राजारामबापू कारखान्यावर आंदोलन करणाऱ्या राजू शेट्टींसह 150 जणांवर गुन्हा

Rajarambapu Factory Protest : ऊस दराच्या प्रश्नासाठी इस्लामपूर येथील राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यावर आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil Shinde

Sangli News : ऊस दराच्या प्रश्नावरून माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूरमधील राजारामबापू पाटील साखऱ कारखानासमोर आंदोलन केले. याप्रकरणी इस्लामपूर पोलीस स्टेशनमध्ये शेट्टींसह 150 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऊस दराच्या प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये प्रशासनाने मध्यस्थी करून कोल्हापूर जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांनी मागील वर्षी ३ हजार रुपयांपेक्षा कमी दर दिला, त्यांनी प्रति टन १०० रुपये व ३ हजारांपेक्षा जास्त दर दिला त्यांनी प्रतिटन ५० रुपये देण्याचा निर्णय घेतला. तसेच यंदा गाळप होणाऱ्या ऊसाला रिकव्हरीनुसार एफआरपी अधिक १०० रुपये पहिली उचल देण्याचे मान्य केले आहे. हा फाॅर्मुला सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यातील राबवावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवारी माजी मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याच्या वजन काट्याच्या समोरील मोकळ्या जागेत ठिय्या मांडला. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस फौजा फाटा तैनात करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गव्हाणीत उडी टाकून गाळप बंद पाडले. या आंदोलननंतर कारखाना प्रशासनाकडून कारखान्याचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून राजू शेट्टी, भागवत जाधव, महेश खराडेंसह १५० कार्यकर्त्यांच्या जमावाविरुद्ध इस्लामपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Drill Subsidy: हिंगणघाट बाजार समिती देणार अनुदानावर पेरणी यंत्र

Farmer Insurance App Issue: ॲप, टोल फ्री नंबरवर तक्रारीची नोंद होईना!

Avocado Farming Success: दिवे येथे अ‍ॅव्होकॅडो फळपीक उत्पादनाचा यशस्वी प्रयोग

Farmer Death: कसमादे पट्ट्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Sugar Industry Growth: साखर उद्योगाला चालना मिळणार

SCROLL FOR NEXT