Credit Society Agrowon
ॲग्रो विशेष

Credit Society : विकास सेवा सोसायटींना मिळणार किरकोळ खत विक्रीचे परवाने

Fertilizer sale License : केंद्र सरकारने प्राथमिक सहकारी संस्थाही बळकट करण्याची योजना आखली आहे. कृषी व सहकार विभागाच्या संयुक्तरित्या सोसायटींचे संगणकीकरण करून त्यांना खत विक्रीचे परवाने देण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

Swapnil Shinde

Co-Operative Societies : केंद्रातील मोदी सरकार दुसऱ्या टर्ममध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना केली. यापूर्वी पूर्वी सहकार क्षेत्र राज्याच्या अखत्यारित होता. पण, देशभरात सहकार चळवळ बळकट करण्यासाठी कडक पाऊले उचण्यास सुरुवात केली. त्यानुसार मागील काही दिवसांपासून राज्यातील प्राथमिक सेवा सोसायटींचे संगणकीयकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर कृषी व सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने या सोसायट्यांना खत विक्रीचे परवाने देण्यात येत आहेत.

केंद्रात सहकार खाते सुरू झाल्यानंतर गावोगावच्या विकास सोसायट्या सक्षम करण्यासाठी संगणकीकरण करण्याचे आदेश राज्यांना देण्यात आले आहे. त्यांतर्गत महाराष्ट्रातील २० हजार ८४४ विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. तसेच कृषी व सहकार खात्याच्या संयुक्त विद्यमाने संगणकीयकरण झालेल्या सोसायटींपैकी ७७८ सोसायटींना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचा परवाना देण्यात येणार आहेत. कृषी आयुक्त कार्यालयाने काढलेल्या आदेशानुसार या सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना किरकोळ खत विक्रीचे काम काम सुरू झाले आहे.

राज्यातील सर्व जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून संगणकीकरण होणाऱ्या २० हजार विकास संस्थांना संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अशा संस्थांना किरकोळ खत विक्रीचा परवाना दिला जात आहे. या परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रात रुपांतर होणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विकास सेवा सोसायट्यांच्या राजकारणाबरोबरच आता ग्रामीण भागातील अर्थकरणही वेगाने बदलणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: दांगट समितीकडून गैरव्यवहारांची चौकशी नको

China Fertilizer Ban: चीनकडून खत निर्यात थांबल्याने उद्योगांवर परिणाम निश्चित

Aashadhi Wari 2025: संतांचे पालखी सोहळे पंढरीच्या वेशीवर

Gujrat Onion Farmers: गुजरातच्या कांदा उत्पादकांना क्विंटलमागे २०० रुपयांची मदत

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’ रद्द करण्याची सरकारला सद्‌बुद्धी दे

SCROLL FOR NEXT