Satara DCC Bank : साताऱ्यातील विकास सोसायट्या १५० विविध व्यवसाय करणार

Credit society : कृषीशी संबंधित व्यवसाय, जनेरिक औषधांचे दुकान, पेट्रोल पंप, सेतू केंद्र, भाजीपाला विक्री केंद्र आदींचा समावेश आहे. संगणकीकरणासाठी अडीच ते साडेतीन लाखांचे साहित्य केंद्राकडून सोसायट्यांना मिळणार आहे.
Satara DCC Bank
Satara DCC Bank AGrowon
Published on
Updated on

Satara News : केंद्र शासनाने विकास सेवा सोसायट्यांना सक्षम बनविण्यासाठी संगणकीकरणासोबतच त्यांना १५० विविध व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. यामध्ये कृषीशी संबंधित व्यवसाय, जनेरिक औषधांचे दुकान, पेट्रोल पंप, सेतू केंद्र, भाजीपाला विक्री केंद्र आदींचा समावेश आहे. संगणकीकरणासाठी अडीच ते साडेतीन लाखांचे साहित्य केंद्राकडून सोसायट्यांना मिळणार आहे. त्यासाठी सर्व सोसायट्यांचे ऑडिट रिपोर्टचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला आहे.

Satara DCC Bank
Credit Societies : विकास सेवा सोयायट्या करणार बियाणे-खतांची विक्री

केंद्र सरकारने देशातील सर्व विकास सेवा सोसायट्यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यावर भर दिला आहे. यामध्ये एकच सॉफ्टवेअर वापरले जाणार आहे. जेणेकरून देशात कुठेही कोणत्याही विकास सेवा सोसायटीची माहिती ऑनलाइन मिळू शकणार आहे. संगणकीकरणासाठी अडीच ते साडेतीन लाख रुपयांचे संगणक व साहित्य दिले जाणार आहे.

Satara DCC Bank
हिवरेबाजारमध्ये यंदाही शंभर टक्के भरली सोसायटी

सोसायट्यांना १५० विविध व्यवसाय करण्याची मुभा दिली आहे. यातून शेतकऱ्यांच्या या संस्था आर्थिक सक्षम होण्याबरोबरच शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ९५६ सोसायट्यांचे संगणकीकरण होणार आहे. त्यासाठी या संस्थांचे ऑडिट करुन त्याचा अहवाल केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. आता लवकरच संगणकीकरणाचे काम हाती घेतले जाईल. सोसायट्यांना १५० व्यवसाय करण्याची मुभा देताना त्यांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यावर भर दिला जात आहे.

या १५० व्यवसायामध्ये कृषीशी संबंधित व्यवसाय, जनरिक औषधे विक्रीचे दुकान, पेट्रोल पंप, भाजीपाला विक्री केंद्र, कॉमन फॅसिलिटी सेंटर, एटीएम, कृषी रोपवाटिका, ऑइल मिल, शेतकरी प्रशिक्षण, मिनी सुपर मार्केट, आरओ पाणी प्रकल्प, कापड व्यवसाय, चिकन, मटन आऊटलेट, रुग्णवाहिका सेवा, ई स्टॅम्ससह मुद्रांक विक्री, संगणक प्रशिक्षण, गॅस वितरण एजन्सी, कॅफे रेस्टारंट, अंगणवाड्यांना अन्न पुरवठा आदी व्यवसायांचा समावेश असून यातील काही व्यवसायांसाठी काही प्रमाणात अनुदानही उपलब्ध केले जाणार आहे. जे पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com