Paddy Seeds Agrowon
ॲग्रो विशेष

Rice Seeds : भात बियाण्यांची चणचण

Kharif Season : पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र भात पेरणीची कामे सुरू झाली आहेत. यंदा जिल्ह्यात एक लाख एक हजार ५१० हेक्टरवर खरिपाची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

Team Agrowon

Pali News : पावसाचे आगमन झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र भात पेरणीची कामे सुरू झाली आहेत. यंदा जिल्ह्यात एक लाख एक हजार ५१० हेक्टरवर खरिपाची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. प्रामुख्याने ९८ हजार ४८७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर तीन हजार ०२३ हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र सुधागड तालुक्यात कृषी सेवा केंद्रावर जया हे भाताचे बियाणे उपलब्ध नसल्‍याने शेतकरी चिंतेत आहेत.

पेण तालुक्यात जया भात बियाणे उपलब्ध नसल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी कार्यालयाकडे आल्या होत्या. कृषी विभागाने दखल घेत कृषी केंद्रांवर बियाणे उपलब्ध करून दिल्‍याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी सांगितले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागत कामे सुरू झाली असून दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरू आहेत.

लागवडीखालील क्षेत्रात वाढ

गतवर्षी ९० हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. या वर्षी त्यात वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात जवळपास २२ हजार क्विंटल सुधारित तर २५० क्विंटल संकरित भात बियाणांचा समावेश आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन केले आहेत. मात्र बियाणे उपलब्ध नसेल तर शेतकऱ्यांनी करायचे काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. काही शेतकरी पदरमोड करून इतर तालुक्यातून बियाणे आणत आहेत.

महाबीजच्या जया या वाणावर शेतकऱ्यांचा विश्वास आहे. सुधागड तालुक्यातील साधारण ८० ते ९० टक्के शेतकरी जया पेरतात. त्याचे उत्पन्न अधिक आहे. मात्र यंदा मागणीपेक्षा कमी बियाणे उपलब्ध झाल्याचे कृषी सेवा केंद्रामार्फत सांगितले जाते. कोरोना कालावधीनंतर शेती करणाऱ्यांची संख्या वाढली असताना बियाणे उपलब्ध न होणे अयोग्य आहे.
नीलेश शिर्के, शेतकरी, सुधागड
जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रावर जया व इतर बियाणे उपलब्ध आहेत. सुधागड तालुक्यात हे बियाणे उपलब्ध नसल्याचे माझ्यापर्यंत अजून आलेले नाही. याबद्दल चौकशी करते. तसे असेल तर त्‍वरित बियाणे उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच बोगस बियाणांबाबत तक्रार असल्‍यास त्‍वरीत कृषी विभागाला कळवावे.
वंदना शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी, अलिबाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement : हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी ४७८ केंद्रे

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Dana Cyclone : ‘डाना’ चक्रीवादळ आज किनाऱ्याला धडकण्याची शक्यता

Fruit Crop Insurance Issue : फळपीक विमा योजनेत बोगस अर्जांचे ‘पीक’

Vidarbha Weather : विदर्भात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT