Team Agrowon
शेतकरी सुधारित भात पीक लागवड पद्धतीचा अवलंब करू लागले असले सर्व चारही सूत्रांचा अवलंब करत नाहीत. त्यामुळे उत्पादनात अपेक्षित वाढ मिळत नाही.
कै. डॉ. नारायण सावंत यांनी चार सूत्री भात लागवड पद्धत एकात्मिक सेंद्रिय रासायनिक तंत्रज्ञानावर आधारित तयार केली आहे.
चार सूत्री भात लागवड हे तंत्र सोपे, शास्त्रीयदृष्ट्या कार्यक्षम, एकूण लागवडीतील बी, मजूर व खत यांच्या खर्चात कमी करणारे, वातावरणाचे प्रदूषण टाळणारे व भातशेती निश्चितपणे फायदेशीर करणारे आहे. त्याची चार सुत्रे पाहुया.
भात पिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर करणे.
वनशेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) या हिरवळीच्या खताचा हेक्टरी २ ते ३ टन वापर करणे.
सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपांची (२५ चूड/चौ.मी.) नियंत्रित लावणी करणे.
नियंत्रित पुनर्लागवडीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया-डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें. मी. खोल खोचणे.