Livestock Census
Livestock CensusAgrowon

Livestock Census : राज्यात ॲपद्वारे होणाऱ्या पशुगणनेस आजपासून प्रारंभ

Animal Census Update : विविध कारणांमुळे गेले काही दिवस रखडलेल्या २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज (ता. २५) राज्यात पशुगणनेला सुरुवात होणार आहे.
Published on

Pune News : विविध कारणांमुळे गेले काही दिवस रखडलेल्या २१ व्या पशुगणनेला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज (ता. २५) राज्यात पशुगणनेला सुरुवात होणार आहे. यासाठी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि गावपातळीवर स्मार्टफोनद्वारे पशुगणना होणार आहे.

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीसाठी पशुसंवर्धनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असली तरी पशुगणना सुरू राहणार आहे, असे पशुसंवर्धन आयुक्तालयाद्वारे सांगण्यात आले. याबाबत पशुसंवर्धन आयुक्त प्रवीणकुमार देवरे यांच्याशी सातत्याने संपर्क असता संपर्क होऊ शकलेला नाही.

Livestock Census
Livestock Census : पशुगणनेला तांत्रिक अडचणींची झळ

पाच वर्षांपूर्वी २० वी पशुगणना झाली. तेव्हा प्रगणकांना टॅब देण्यात आले होते. त्यावर माहिती भरून घेतली होती. आता प्रगणकांना मोबाइलवर पशुधनाची माहिती भरावी लागणार आहे. प्रगणकांना मानधन, मोबाइल वापराचा वेगळा मोबदला दिला जाणार आहे. पशुगणना करण्यासाठी तीन हजार घरांमागे एक प्रगणक नेमण्यात आले आहेत. शासकीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना या सर्वेक्षणात प्राधान्य दिले गेले आहे.

Livestock Census
Livestock Census : पशुगणनेत पहिल्यांदाच भटक्या पशुपालकांचा समावेश

तसेच, प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी, तसेच पदवीधारक विद्यार्थी प्रगणक म्हणून या मोहिमेत सहभागी होत आहेत. पशुगणना मोहिमेत गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळी, मेंढी, कुक्कुट, अश्व, वराह, पाळीव कुत्री, भटकी जनावरे, पशुपालन वापरली जाणारी यंत्रसामग्री यांची गणना केली जाणार आहे. गणना केलेल्या आधारावरच शासनाकडून विविध धोरण योजना आखल्या जातात. तसेच निधीची उपलब्धता केली जाते.

सविस्तर माहितीचे संकलन

पाळीव पशुगणनेस १९१९ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून दर पाच वर्षांनी गणना केली जाते. पशुपालनाच्या क्षेत्रात धोरणांची निर्मिती आणि विविध योजनांनी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरत आली आहे. गणनेचा भाग म्हणून दारोदारी जाऊन केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणामार्फत देशभरातील पाळीव पशुपक्षांबाबत सविस्तर माहिती संकलित केली जाते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com