Sand Excavation  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Excavation : अवैध वाळू उत्खनन, वाहतुकीवर कायदेशीर कारवाई करा

Sand Mafia : याबाबत मिळालेली माहिती अशी, की दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर शनिवारी (ता. २२) पहाटे साडेतीनच्या सुमारास काळाने घाला घातला.

Team Agrowon

Jalna News : जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी (ता. २३) विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी पासोडी येथे भेट देऊन घडलेल्या घटनेबाबत पोलिस विभागामार्फत करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेतला.

याबाबत मिळालेली माहिती अशी, की दिवसभर पुलाचे काम करून पत्र्याच्या शेडमध्ये रात्री झोप घेणाऱ्या मजुरावर शनिवारी (ता. २२) पहाटे साडेतीनच्या सुमारास काळाने घाला घातला.

रात्रीच्या वेळी अवैद्यरित्या वाळूची वाहतूक करणाऱ्या टिप्पर चालकाने मजूर झोपलेल्या शेडलगत वाळू खाली केली. ती शेडच्या जास्त जवळ झाल्याने पत्रासह वाळू झोपलेल्या मजुरांच्या अंगावर पडून पत्रे व वाळुखाली दबून पाच मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

त्यानंतर अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त यांची घटनास्थळ व वाळू घाटांवरील भेट महत्त्वाची मानली जाते आहे. आयुक्त श्री. गावडे यांनी डावरगाव व गारखेडा येथील वाळू घाटांना भेट दिली.

तसेच तालुकास्तरीय महसूल व पोलिस प्रशासनाने तालुक्यामध्ये अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहतूक प्रतिबंध करण्यासाठी रात्रीचे व दिवसाचे तसेच बैठे पथक स्थापन करून संयुक्त कारवाईच्या सूचना केल्या. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल आदींची उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bamboo Policy: ‘बांबू धोरण २०२५’ राबविण्याचे आदेश

Mahavistar App: कोणत्या हंगामात काय पेरायचं, कधी विकायचं?

India Russia Relations: पंतप्रधान मोदी दबावाला बळी न पडणारे नेते

Sugar Mills: कोट्यापेक्षा जास्त साखर विक्री केल्यास दंडात्मक कारवाई

Rabi Crop Loan: रब्बी पीककर्ज वितरण संथ गतीने

SCROLL FOR NEXT