Cow Milk Subsidy agrowon
ॲग्रो विशेष

Cow Milk Subsidy : गोकुळकडून तब्बल अडीच कोटी रुपये गाय दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा

Arun Dongale : गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा भरविणार असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जाहीर केले.

sandeep Shirguppe

Gokul Milk Sangh : गोकुळने राज्यात सर्वाधिक गाय दुधाचे अनुदान अडीच कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून, गाय दूध अनुदान सर्वात जलद गतीने काम करणारा गोकुळ एकमेव सहकारी संघ आहे. शासनदरापेक्षा गाय दूध दरात सहा रुपये जास्त देत असून, महाराष्ट्रात गोकुळ संघ सर्वाधिक म्हैस व गाय दूध दर देत आहे. दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात वाढ केली असून, गोकुळच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त 'गोकुळ केसरी' कुस्ती स्पर्धा भरविणार असल्याचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी जाहीर केले.

'गोकुळ'च्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा, तालुकास्तरावर क्रमांक आलेल्या दूध संस्थांचा, दूध व दुग्धजन्य वितरक यांच्या गौरवप्रसंगी ते बोलत होते. अमृतसिद्धी हॉल, कळंबा येथे हा कार्यक्रम झाला.

अध्यक्ष डोंगळे म्हणाले, 'गोकुळला ७३०३ संस्था दूधपुरवठा करत असून, ५२०६ सभासद आहेत. संघाकडे दररोज १७ लाख लिटर दूध संकलन होत असून दररोज १४ लाख लिटर दुधाची विक्री होते. जातीवंत म्हैस खरेदीसाठी ४० हजार रुपये अनुदान करण्यात आले असून गोकुळ श्री साठी एक लाखाचे बक्षीस जाहीर केले.

दूध उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी 'गोकुळ कट्टा' प्रचार प्रसिद्धीसाठी सुरू केला जाणार असून नजीकच्या काळात गोकुळचा पेट्रोल पंप सुरू करण्यात येणार आहे.' ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी संघाच्या विकासाचा आढावा घेतला.

अजित नरके यांनी अमृतसिद्धी हॉल व गोकुळचे ऋणानुबंध असल्याचे सांगितले. यावेळी बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, अमर पाटील, एस. आर. पाटील, नंदकुमार ढेंगे, आर. के. मोरे, अभिजित तायशेटे, बयाजी शेळके, अंजना रेडेकर उपस्थित होते. आभार शशिकांत पाटील यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT