Jail  Agrowon
ॲग्रो विशेष

Criminal Counseling : गुन्हेगारी निर्मूलनासाठी कैद्यांचे समुपदेशन

गुन्हेगारी निर्मूलनासाठी समुपदेशन वरदान ठरत असल्याचे चित्र सध्या कारागृहात दिसत आहे.

Team Agrowon

Alibag News : कैद्यांमध्ये मानवतेची भावना निर्माण व्हावी यासाठी जिल्हा कारागृहातील (District Jail) कैद्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रम राबवून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शासकीय अधिकाऱ्यांसह वेगवेगळ्या सामाजिक, आध्यात्मिक संस्था-संघटनाच्या मदतीने कैद्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्‍यामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक दृष्‍टिकोन निर्माण होत असल्याचे जिल्हा कारागृहातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

गुन्हेगारी निर्मूलनासाठी समुपदेशन वरदान ठरत असल्याचे चित्र सध्या कारागृहात दिसत आहे.

अलिबागमधील जिल्‍हा कारागृहात २०० पुरुष व ८० महिला असे एकूण २८० कैद्यांची क्षमता आहे. सध्या १२१ कच्चे कैदी असून त्यात १९६ पुरुष व १६ महिला कैदी शिक्षा भोगत आहे.

यात विनयभंग, अत्याचार, चोरी, घरफोडीतील गुन्हेगारही असून १८ ते ४० वयोगटातील ८० टक्के कैद्यांचा समावेश आहे. कारागृहात खुनासारखे गंभीर गुन्हे केलेले ५९ कैदी आहेत. त्यामध्ये पाच महिला व ५४ पुरुषांचा समावेश आहे. २० ते ४५ वयोगटातील हे कैदी आहेत.

जिल्हा कारागृह अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दोन अधिकारी, चार हवालदार व २५ शिपाई कारागृहात कार्यरत आहेत. त्यांच्या माध्यमातून कैद्यांवर लक्ष ठेवण्याचे काम केले जात आहे.

कैद्यांकडून पुन्हा गुन्हे घडू नये तसेच त्यांच्यामध्ये मानवतेची भावना निर्माण व्हावी, यासाठी जिल्हा कारागृहात येणाऱ्या कैद्यांना आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, क्रीडा अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे धडे दिले जातात.

रागाच्या भरात केलेल्या कृत्यांमुळे त्याचा कुटुंबावर व स्वतःवर तसेच समाजावर कसा परिणाम होतो, याची माहिती देऊन कैद्यांमध्ये जनजागृती केली जाते. सरखेल कान्होजी आंग्रेकालीन कारागृहातील मंदिरात सकाळ-संध्याकाळ भजन, कीर्तनाचा कार्यक्रम घेतले जातात.

कैद्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये कारागृहातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी, समता फाउंडेशन, वामनराव पै, प्रथम अशा वेगवेगळ्या सामाजिक, धार्मिक संस्थांमार्फत वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत.

राज्यस्तरीय भजनात उत्तेजनार्थ बक्षीस

कैद्यांमध्ये सकारात्मक दृष्‍टिकोन निर्माण व्हावा, गुन्हेगारीपासून दूर राहावे, माणूस म्हणून जगण्याची भावना निर्माण व्हावी हा उद्देश समोर ठेवून पुणे येथील शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने जगद्‌गुरू श्रीसंत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धा नुकतीच घेण्यात आली होती.

या स्पर्धेत राज्यातील ४८ कारागृहातील कैद्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रायगड जिल्ह्यामधील कारागृहातील कैद्दीही सहभागी झाले होते. स्पर्धेत उत्तेजनार्थ म्हणून बक्षिस देऊन कैद्यांना गौरवण्यात आले.

कैद्यांची आरोग्य तपासणी

जिल्हा सामान्य रुग्णालय व वेगवेगळ्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जिल्हा कारागृहातील कैद्यांसाठी आरोग्य तपासणी केली जात आहे.

नेत्रचिकित्‍सा, कर्करोग निवारण, क्षयरोग, कुष्‍ठरोग, एचआयव्ही, स्कीन तपासणी शिबिराच्या माध्यमातून घेतली जाते. आतापर्यंत ५६ कैद्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहेत.

जिल्हा कारागृहात येणाऱ्या कैद्यांना सामाजिक, धार्मिक संस्था, संघटनेच्या माध्यमातून तसेच कारागृहातील अधिकाऱ्यांच्या माध्यमातून वेळोवेळी समुपदेशन केले जाते. त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्‍टिकोन निर्माण व्हावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत.
अशोक कारकरे, जिल्हा कारागृह अधीक्षक, रायगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT