Cotton Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seed Scam : कापसाचे बियाणे विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

Overpriced Cotton Seed : या प्रकरणी त्रिमूर्ती अग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे मालक प्रणय बाबासाहेब रोडे यांच्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : कापसाच्या बियाण्याच्या पाकिटाची किंमत ९०१ रुपये असताना ती १४०० रुपयांना विक्री केली जात असल्याचा प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे उघडकीस आला. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करून बियाणाची जादा दराने विक्री होत असल्याची बाब उघडकीस आणल्यानंतर संबंधित निविष्ठा विक्रेत्यावर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी त्रिमूर्ती अग्रो सर्व्हिसेस या दुकानाचे मालक प्रणय बाबासाहेब रोडे यांच्याविरोधात नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर प्रताप कोपनर यांनी तक्रार दिली आहे. खरिपासाठी शेतकऱ्यांकडून कापसाच्या बियाण्याची खरेदी सुरू आहे.

पाचेगाव येथे अधिक मागणी असलेल्या बियाणाची जादा दराने विक्री होत असल्याची तक्रार कृषी विभागाकडे आली होती. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, कृषी विकास अधिकारी सुधीर शिंदे, मोहीम अधिकारी अमृत गांगर्डे यांच्या मागदर्शनाखाली नेवासा पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी प्रताप कोपनर, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल ढगे यांनी पाचेगावांत त्रिमूर्ती अग्रो सर्व्हिसेस या दुकानाला भेट देऊन तपासणी केली.

तेथे ९०१ रुपये किमतीचे कापसाच्या बियाण्याचे पाकीट चौदाशे रुपयाला विक्री केल्याचे तसेच त्या संबंधित ऑनलाइन पैसे घेतल्याचे उघड झाले. तपासणीदरम्यान खरेदी चलनावर कोणत्याही प्रकारचा बियाणे लॉट क्रमांक आढळला नाही. तसेच दुकानात साठा, भावफलक अद्ययावत नसल्याचे दिसून आले. कृषी विभागाने बियाणे नियंत्रण आदेश १९८३ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या विविध कलमांखाली कारवाई केली.

तालुक्याचे पथक काय करतेय?

कापसाच्या बियाण्याचा काळाबाजार करून जादा दराने विक्री होण्याचे प्रमाण नेवासा तालुक्यातच अधिक आहे. गेल्या वर्षीही या भागामध्ये असे काही प्रकार आढळून आले होते. पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून व जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी तपासणी करून पाचेगाव येथे जादा दराने कापूस बियाणे विक्री होण्याचा प्रकार उघडकीस केला असला तरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे पथक काय करते, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Forest Area : राज्याचे वनक्षेत्र आकसत असल्याने चिंतेत भर

Mumbai APMC Scam : मुंबई बाजार समितीमधील रस्ते काँक्रीट निविदा घोटाळा

Onion Subsidy : फेरछाननीअंती १४ हजार शेतकरी प्रलंबित कांदा अनुदानास पात्र

Sugar Export : साखर निर्यातीचे उद्दिष्ट अपूर्ण राहण्याची शक्यता

Rain Alert Maharashtra : कोकण, घाटमाथ्यावर ‘रेड अलर्ट’

SCROLL FOR NEXT