Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : दोन वेचण्यांतच कपाशीच्या पऱ्हाट्या

Cotton Crop : तालुक्याला मागील काही वर्षांपासून लागलेले दुष्काळाचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : तालुक्यात दुष्काळाने भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांत भीषण पाणीटंचाई जाणवत असून, अवकाळीने खरिपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. परिणामी अनेक भागांत पहिल्या किंवा दुसऱ्या वेचणीतच कपाशीच्या पऱ्हाट्या झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

तालुक्याला मागील काही वर्षांपासून लागलेले दुष्काळाचे ग्रहण अजूनही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. परिणामी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हैराण झाला आहे. यंदाही वरुणराजाच्या वक्रदृष्टीने तालुका दुष्काळात होरपळत आहे. त्यात जेमतेम पावसावर आलेल्या मका, सोयाबीन, कपाशीचे अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

या पावसाने थोड्याफार प्रमाणात येणाऱ्या कपाशीसह इतर पिके हातची गेली आहेत. एरवी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत कापूस वेचणी सुरू असते. परंतु यंदा मोठ्या प्रमाणावर कापसाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. कमी पाऊस, उन्हाचा कडाका व ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस यामुळे पांढरे सोने डिसेंबरच्या अखेरीस शेतातून हद्दपार होण्याची शक्यता आहे.

अनेक शेतांत पहिल्याच वेचणीत पऱ्हाट्या दिसत आहेत. यंदाच्या दुष्काळात अनेकांचे मका पीक हातचे गेले. कापूसही हद्दपार होणार असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत.

यावर्षी खरिपाची लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, पावसाने ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले. या खरीप हंगामात काही प्रमाणात मका, उडीद, मूग, भुईमूग, तूर यासह कडधान्ये पेरली होती. पण, ते देखील हाती लागले नसल्याने अनेकांची कापसावर भिस्त होती. ती देखील अवकाळीने मावळल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT