Cotton Picking  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : खानदेशात कापूस वेचणी मजुरीदर स्थिर

Labor Shortage : खानदेशात दिवाळी सण तोंडावर असतानाच कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मजुरीदर स्थिर असून, मजूरटंचाई मात्र कायम आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात दिवाळी सण तोंडावर असतानाच कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. मजुरीदर स्थिर असून, मजूरटंचाई मात्र कायम आहे. सततच्या पावसाने कापूस पिकाची हानी होत आहे. यात वेचणी करून घेण्याची लगबग शेतकरी करीत आहेत.

मजुरी दर मात्र सध्या परवडत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण सध्या खानदेशात कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ६५०० रुपये दर आहे. याच दरात कापसाची खेडा खरेदी सुरू आहे.

कापसाचे दर यंदाही अस्थिर आहेत. यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. मागील हंगामातही दर कमी होते. मागील वेळेस सरासरी साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर शेतकऱ्यांना मिळाला. यंदाही अशीच स्थिती आहे. परंतु मजुरी दर २०२१ मध्ये दुप्पट झाले. ते दर तसेच आहेत. कारण २०२१ मध्ये काही किंवा मोजक्या शेतकऱ्यांना आठ ते साडेआठ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता.

पुढेही कापूस दर वाढतील, दर नऊ ते १० हजार रुपये मिळतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. यातच कापसाला चांगले दर असल्याचे हेरत मजुरांनी दरांसाठी शेतकऱ्यांची कोंडी केली व मजुरी दर वाढवून घेतले. २०२१ मध्ये कापूस वेचणीचे दर दुप्पट झाले. एक किलो कापूस वेचणीसाठी पाच रुपये द्यावे लागत होते. अशीच स्थिती आताही आहे.

कापूस वेचणीसाठी सध्या पाच रुपये प्रतिकिलोचे दर आहेत. तर जेथे कापूस वेचणीला कमी आहे किंवा बोंडे कमी उमलली आहेत, तेथे मजूर २०० रुपये रोज, अशी मजुरी घेत आहेत. सकाळी आठ ते दुपारी अडीच या कालावधीत कापूस वेचणीसाठी ही मजुरी आहे. ही मजुरी शेतकऱ्यांना सध्या परवडत नसल्याची स्थिती आहे. कारण कापसाचे दर अस्थिर किंवा सध्या सरासरी साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल, असे आहेत. कापूस दरात वाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

 अन्य भागांतून मजूर आणण्याची धावपळ

मजूर टंचाई मात्र कायम आहे. गावात मजूरसंख्या कमी आहे. यामुळे अनेक कापूस उत्पादक नजीकच्या मोठ्या गावांतून मजूर आणत आहेत. यात मजुरांची वाहनांतून ने-आण करावी लागते. यासाठीचे वाहतूक भाडे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहे.

एकाच वेळी अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणीवर आला आहे. यात दसरा व लागलीच दिवाळी सण आला आहे. या सणांच्या कालावधीत कामकाज बंद ठेवण्याची वेळ आहे. यामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. आपल्या क्षेत्रातील कापसाची वेचणी एक-दोन दिवसातच पूर्ण व्हावी, असा प्रयत्न शेतकरी करीत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : मक्याच्या बाजारात चढ उतार; कापूस, सोयाबीन, ज्वारी तसेच काय आहेत आजचे मका दर ?

Rain Update : 'डाना' चक्रीवादळाचा जमिनीवरील प्रवास सुरू; राज्यात रविवारपासून पाऊस? 

Fodder Production : चारा उत्पादन कमी; पावसाने दर्जा खालावला

Agriculture Work : पावसाने उघडीप दिल्याने शेतीकामांनी घेतला वेग

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गावरून सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात जुंपली

SCROLL FOR NEXT