Cotton Picking : कापूस पिकात वेचणी सुरू; मजुरी दर परवडेना

Labor Shortage : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. दुसरीकडे मजूरटंचाईदेखील आहे. मजुरी दर २०२१ मध्ये वाढले.
Cotton Picking
Cotton Picking Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पिकात वेचणी सुरू आहे. दुसरीकडे मजूरटंचाईदेखील आहे. मजुरी दर २०२१ मध्ये वाढले. आता कापूस दर ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल असून, यानुसार मजुरीदर परवडत नसल्याची स्थिती आहे.

पूर्वहंगामी किंवा बागायती कापूस लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. त्यात आता वेचणी सुरू आहे. तसेच कापूस, केळी, भाजीपाला व अन्य पिकांत तणही परतीच्या पावसाने वाढले आहे, पण खरिपानंतर आता रब्बीतही मजूरटंचाई जाणवत आहे. केळी, भाजीपाला पिकात तण काढणे आवश्यक आहे.

Cotton Picking
Cotton Picking : कापसाच्या वेचणीत मजूरटंचाईची समस्या

पण मजूर नसल्याने अनेक शेतकरी तणनाशकांचा वापर करीत आहेत. २०२१ मध्ये कापूसदर ८२०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल होते. काही शेतकऱ्यांना यापेक्षा अधिक दर मिळाले. परंतु २०२२, २०२३ व २०२४ मध्येही कापसाला दर हवे तसे मिळालेले नाहीत. केळी दरही कमी आहेत. सोयाबीन, उडीद, मूग पिकात मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

Cotton Picking
Cotton Picking : शेतकरी, मजुरांमध्ये 'फिफ्टी-फिफ्टी फॉर्म्युला'

कापूसदर आता कमी असल्याने मजुरी दर कमी करावेत, प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कापूस दर सध्या ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कापसाला एकरी खर्च २५००० रुपयांवर आहे. कापसाचे एकरी उत्पादन चार क्विंटल बागायती कापसासंबंधी येते. तर कोरडवाहू कापसाचे उत्पादन एक क्विंटलही येत नाही.

यामुळे आताचे २०० रुपये मजुरीदर परवडत नाहीत. कापसाचे दर एकच वर्षी चांगले होते. यामुळे मजुरीचे दरही वाढवा, अशी मागणी ग्रामीण भागात सुरू झाली. शेतकऱ्यांनीही मजुरी दर वाढविले होते. पण कापूसदर ६५०० ते ७००० रुपये प्रतिक्विंटल मिळाला. मजूरटंचाईमुळे अनेक शेतकरी कुटुंबीयांच्या मदतीने तण काढणी, आंतरमशागत, कापूस वेचणी करून घेत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com