Cotton Exports agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Exports : कापूस निर्यातील अनुकूल स्थिती परंतु दराची स्थिती काय?

Maharashtra Cotton : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे.

sandeep Shirguppe

Cotton Production : यंदा कापसाचे उत्पादन घटल्याने फेब्रुवारी या महिन्यात कापसाची निर्यात गेल्या दोन वर्षांतील उच्चांकी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ससेहोलपट होत आहे. अशात कापसाचे देशांतर्गत उत्पादन घटले असले तरी निर्यातीला अनुकूल स्थिती असल्याने उत्पादकांना लाभ होणार असल्याचे बोलले जाते.

देशातील व्यापाऱ्यांनी आशियातील प्रमुख खरेदीदारांसोबत कापसाच्या तब्बल ४ लाख गाठींच्या खरेदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. फेब्रुवारी या एका महिन्यात व्यापाऱ्यांनी चीन, बांगलादेश, व्हिएतनाम या आशियाई देशांसोबत ४ लाख कापसाच्या गाठी (६८ हजार मेट्रिक टन) निर्यातीसाठी करार केले आहेत. यामुळे यंदा कापसाला चांगला भाव मिळेल असे बोलले जात आहे.

यंदाच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात भारताकडून २० लाख गाठींची निर्यात होण्याची शक्यता आहे. उत्पादन घटल्याने देशातून अंदाजे १४ लाख गाठींची निर्यात होईल, असा अंदाज व्यक्त केला जातोय. काही व्यापाऱ्यांच्या मते निर्यात २५ लाख गाठींहून अधिक होऊ शकते.

जगभरातील बाजारांमध्ये कापसाची वाढलेली मागणी आणि वाढलेली निर्यातक्षमता याचा लाभ देशाला मिळण्याची शक्यता आहे. पण दुसरीकडे कापसाचे स्थानिक उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी झाल्याने निर्यातीवर दबाव येऊ शकतो. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार, २०२३-२४ या वर्षात भारतातील कापसाचे उत्पादन ७.७ टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. २००७-०८ नंतर कापूस उत्पादनाचा हा नीचांक आहे.

कारणे काय?

प्रमुख निर्यातदारांच्या तुलनेत भारतीय कापूस स्वस्त आहे. प्रमुख निर्यातदारांमध्ये अमेरिका आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. या दोन्ही देशांशी भारताचे सलोख्याचे संबंध आहेत. यामुळे कापूस निर्यातीला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजेच अमेरिकेच्या वायदे बाजारात कापसाचे भाव ८० सेंटवरून ९४ सेटपर्यंत पोचले आहेत. म्हणजेच १४ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलवरून रुईचा भाव १७ हजार २०० रुपयांपर्यंत पोचला. याचाच अर्थ असा की आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव एकाच महिन्यात तब्बल १६ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यानंतर देशातील वायदेही वाढले आहेत. पण त्याप्रमाणात प्रत्यक्ष कापूस खरेदीचे भाव वाढले नाहीत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT