Cotton Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Picking : कापूस वेचणीला आला; सीतादहीची लगबग

Cotton Crop : खरीप हंगामात लावगड केलेल्या कपाशी पिकातून आता सार्वत्रिक वेचणी सुरू झाली. ग्रामीण भागात सीतादही करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.

Team Agrowon

Buldnaa News : खरीप हंगामात लावगड केलेल्या कपाशी पिकातून आता सार्वत्रिक वेचणी सुरू झाली. ग्रामीण भागात सीतादही करण्याची लगबग शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. सोयाबीनचा हंगाम तितकासा फायदेशीर नसल्याने आता शेतकरी कपाशी पिकावर आशा ठेवून आहेत.

यंदा या भागात पावसाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे सोयाबीनचा हंगाम यावर्षी पुरता लांबला आहे. आता सोयाबीन हंगाम शेवटच्या टप्प्यात आला तर कपाशीचा हंगामही सुरू होत असल्याने मजूर मिळणे कठीण बाब बनली आहे.

यावर्षी जूनमध्ये शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी केली आहे. मात्र, जुलैपासून सलग पाऊस झाला. यावर्षी पावसाचा अतिरेक झाल्याने या भागात अगदी पावसाचा फटका पिकांना बसला. पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन, कपाशीचे पीक बहरले नाही ही वस्तुस्थिती आहे.

या वर्षी तालुक्यात कपाशीचा लागवड घटलेली आहे. शिवाय कपाशीवर विविध रोगांचे आक्रमण झाले. बरीच कपाशी लालसर झाल्याने उत्पादनात मोठी घट येणार असल्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या कापसाचे बाजारभाव सहा ते साडेसहा हजार आहेत. प्रत्यक्ष लावगडीपासून ते उत्पादन तयार होईपर्यंत कपाशीचा मोठ्या प्रमाणात खर्च आहे.

रासायनिक खते, बी बियाणे, कीटकनाशक फवारणी, निंदण, वखरणी, डवरणी आदी खर्चासह वेचणी खर्च पाहता हे भाव शेतकऱ्यांना परवडेनासे आहेत. कमी उत्पादनामुळे भविष्यात कपाशीचे भाव वाढतील अशी शेतकऱ्यांना आशा आहे.

सोयाबीन उत्पादक उद्ध्वस्त

सोयाबीन फुलोरावस्थेत असताना यावर्षी सतत झालेल्या पावसाने सोयाबीन पाहिजे त्या प्रमाणात भरले नाही. पर्यायाने सोयाबीनची उत्पादकता कमी राहील. काही निवडक वाणांना थोड्याफार शेतकऱ्यांना उत्पादन झाले. सोयाबीन पिकाचा वाढता खर्च आणि उत्पादन याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. शिवाय सोयाबीनचे घसरलेले भाव यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur Assembly Election : कोल्हापुरात २२१ उमेदवारांचे ३२४ अर्ज दाखल, आज होणार छाननी

Farmers Deewali : कोकणकरांची दिवाळी शिवारातच; पावसाने भात कापणी लांबणीवर, काही ठिकाणी भात पिकाचे नुकसान

Paddy Farming : भात शेतीतील मिथेन उत्सर्जन कमी करणारे सोपे तंत्रज्ञान

Agriculture Technology : बीज प्रक्रियेसाठी नॅनोप्राइमर्स तंत्रज्ञानाचा वापर

Agriculture Technology : कापणी यंत्रे वापरतानाच्या समस्या, त्यांचे व्यवस्थापन

SCROLL FOR NEXT