Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : कोल्हापुरातील टोमॅटो शेतकऱ्यांवर आर्थिक संकट; खर्च २० रूपयांचा दर ५ रूपये

Tomato Production : टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यांतील सर्व विभागांतील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.

sandeep Shirguppe

Farmers In Kolhapur : कोल्हापूर बाजार समितीच्या आवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने टोमॅटो दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात १ किलो टोमॅटोला ५ रुपये किलो, तर किरकोळ बाजारात किलोला १० ते १५ रुपये भाव मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. १ किलो टोमॅटो उत्पादनासाठी खर्च १५ ते २० रुपयांपर्यंत गेल्यामुळे टोमॅटोची शेती तोट्याची बनली आहे.

गतवर्षी ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारात १ किलो टोमॅटोचे दर १०० रुपयांपर्यंत गेले होते. पावसामुळे टोमॅटोची आवक कमी झाल्याने दरवाढ झाली होती. टोमॅटोला भाव मिळाल्याने पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, नाशिक, सोलापूरसह राज्यांतील सर्व विभागांतील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. लागवड चांगली झाल्याने महिन्याभरापासून सर्व बाजार समितींच्या आवारात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीस पाठविला. टोमॅटोची आवक वाढल्याने भावात घट झाली.

करवीर आणि शिरोळ तालुक्यात टोमॅटोचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. करवीर तालुक्यातील जठारवाडीचे टोमॅटो उत्पादक शेतकरी तानाजी पाटील म्हणाले की, "घाऊक बाजारात ५ रुपये किलो भाव मिळत असल्याने टोमॅटो फेकून देण्याशिवाय पर्याय नाही. टोमॅटोची तोडणी आणि वाहतूक खर्च परवडत नाही. टोमॅटो व भाजी पिकाला हमीभाव मिळायला तरच शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील. असे पाटील म्हणाले.

कोल्हापूर बाजार समितीचे सभापती प्रकाश देसाई म्हणाले की, "टोमॅटोची आवक वाढली आहे. पुढे टोमॅटोला मागणी नसल्याने दरावर परिणाम होतो. शेतकऱ्यांनी भाजीपाला पिके करताना विविध पिके घ्यावीत, यामुळे मार्केटमध्ये शेती मालाचा समतोल राहील आणि दर मिळेल". असे देसाई म्हणाले.

कोल्हापूर बाजार समितीत ७ हजार ८०० क्विंटल एका दिवसात टोमॅटोची आवक झाली. त्यामुळे होलसेल दर ५ ते १५ रुपयांवर आला आहे. वातावरणातील बदल, खते, मजुरी इतर घटकांचे वाढलेले दर, यामुळे १ किलोला टोमॅटोचा उत्पादन खर्च १५ ते २० रुपयांपर्यंत गेला आहे. यातच टोमॅटोला भाव न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

घाऊक बाजारात टोमॅटो विक्रीस पाठविणेही शेतकऱ्यांना परवडत नाही. बाजार शुल्क आकारणी (पट्टी), वाहतूक खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ विक्री करणारे शेतकरी रस्त्याकडेला बसून दहा रुपये किलोने टोमॅटो विक्री करत आहेत. जाणे-येण्याचाही खर्च परवडत नाही, अशी अवस्था शेतकऱ्यांची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT