Coriander Agrowon
ॲग्रो विशेष

Coriander Rate : कोथिंबीर अमरावतीत दबावात, नागपुरात तेजीत

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Vegetable Market : नागपूर ः वाढती मागणी आणि त्या तुलनेत पुरवठा कमी या कारणामुळे विदर्भातील बहुतांश भाजी बाजारात कोथिंबिरीचे दर तेजीत आले होते. अमरावती येथील फळ आणि भाजी बाजारात ७००० ते १०००० रुपये क्‍विंटलने कोथिंबिरीचे व्यवहार झाले. आता कोथिंबिरीचे दर चार हजार ते सहा हजार रुपयांवर आले आहेत. नागपूरच्या कळमना बाजारात मात्र दर आठ हजार ते दहा हजार रुपयांवर होते. बाजारातील कोथिंबिरीची आवक २० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे.

अमरावती बाजाराचा विचार करता गेल्या आठवड्यात कोथिंबीर ६००० ते ८००० रुपयांनी या ठिकाणी विकली गेली. या वेळी आवकही २० क्‍विंटलच्या घरात होती. त्यानंतर शुक्रवार (ता.२८ ) पर्यंत या दरात सुधारणा होत हे दर ७००० ते १०००० रुपयांवर पोचले. आता अमरावती बाजारात कोथिंबिरीचे दर दबावात आले आहेत. चार हजार ते सहा हजार रुपयांनी या ठिकाणी व्यवहार होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

नागपूरच्या कळमना बाजारात आवक २०० क्‍विंटलवर स्थिर असताना दरात मात्र मोठे चढ-उतार अनुभवले जात आहेत. जूनच्या सुरवातीला या बाजारात ६००० ते १०००० रुपये असा कोथिंबिरीचा दर होता. त्यानंतर ६००० ते ८००० रुपयांनी काही काळ व्यवहार झाले. जूनच्या पंधरवड्यात ४००० ते १०००० रुपये दर मिळाला. ६००० ते ९००० आणि त्यानंतरचे काही दिवस ७००० ते १२००० रुपयांनी या ठिकाणी कोथिंबिरीचे व्यवहार होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले. कळमना बाजारात सद्यःस्थितीत आठ हजार ते दहा हजार रुपयांनी कोथिंबिरीचे व्यवहार होत असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT