Co operative Societies Election agrowon
ॲग्रो विशेष

Co-operative Societies Election : विधानसभा निवडणुकांमुळे सहकार संस्थांच्या निवडणुका पुन्हा ढकलल्या पुढे

sandeep Shirguppe

Assembly Election Maharashtra : विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे राज्‍यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांना तिसऱ्यांदा स्थगिती देण्यात आली आहे. २०२४-२५ या वर्षातील २९ हजार ४२९ सहकारी संस्थांच्या निवडणुका अद्याप प्रलंबित आहेत. त्यापैकी ७ हजार १०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे तीन हजार संस्थांचा यामध्ये समावेश आहे. अ वर्गातील एकाही संस्थेचा यात समावेश नाही, तर ब, क आणि ड वर्गातील संस्थांचा समावेश आहे. स्थानिक सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा परिणाम विधानसभेसह जिल्ह्यातील राजकारणावर होणार असल्याने सरकारकडून हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

जून २०२४ मध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत निवडणूक स्थगित केली होती. तत्पूर्वी लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे स्थगिती दिली होती. आता विधानसभा निवडणुकीमुळे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत ही निवडणूक स्थगित केली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका आता थेट पुढील वर्षात होणार आहेत.

याबाबतचे आदेश अवर सचिव अनिल चौधरी यांनी प्रसिद्ध केले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सुद्धा हे आदेश उपलब्ध आहेत.

२९ हजार ४४३ संस्थांची निवडणूक प्रक्रिया होती सुरू

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या अहवालानुसार २९ हजार ४४३ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली होती. यात 'अ' वर्गातील ४२, 'ब' वर्गातील १ हजार ७१६, 'क' वर्गातील १२ हजार २५० आणि 'ड' वर्गातील १५ हजार ४३५ संस्थांचा समावेश आहे. त्यापैकी ७ हजार १०९ सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goshala Anudan : गोशाळांच्या अनुदानाला राज्य सरकारची मान्यता; अनुदान बँक खात्यावर जमा होणार

Crop Damage : धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबरमधील अतिवृष्टीची एक लाख हेक्टरला बाधा

Devna Water Project : जलसंजीवनीसाठी ममदापूर, देवना प्रकल्प महत्त्वपूर्ण

Crop Loan : पीककर्ज वाटपात ‘डीसीसी’सोबत स्टेट बँकेचेही आघाडी

Agriculture Science Center : कृषी विज्ञान संकुलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची सेवा

SCROLL FOR NEXT