Agricultural Department Employees : कृषी आस्थापना कर्मचाऱ्यांचे दहा दिवसांनंतर आंदोलन मागे

Issue of Appointment to the post of Joint Director of Establishment : आस्थापना सहसंचालक पदाच्या नियुक्तीप्रकरणी कृषी विभागाच्या लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले राज्यव्यापी आंदोलन अखेर दहा दिवसांनंतर मागे घेतले आहे.
Agricultural Department Employees
Agricultural Department EmployeesAgrowon
Published on
Updated on

Pune News : आस्थापना सहसंचालक पदाच्या नियुक्तीप्रकरणी कृषी विभागाच्या लिपिक संवर्ग कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले राज्यव्यापी आंदोलन अखेर दहा दिवसांनंतर मागे घेतले आहे. हा मुद्दा आता ‘मॅट’कडे नेण्याचा निर्णय लिपिक संवर्ग संघटनेने घेतला आहे.

आस्थापना सहसंचालकपद एक मे २०२३ पासून रिक्त होते व अतिरिक्त पदभार राजेश जाधव यांच्याकडे होता. या पदावर लिपिक संवर्गातील प्रशासकीय अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, असा २००९ चा सेवाभरती नियम आहे. त्यामुळे या पदावर सध्याचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी जाधव यांचीच पूर्णवेळ नियुक्ती व्हावी, असे लिपिक संवर्गाचे म्हणणे होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार, काळ्या फिती लावून काम करणे, लेखणीबंद आंदोलन करण्यात आले होते.

Agricultural Department Employees
Agriculture Department : पदोन्नत्या थांबवा; अन्यथा न्यायालयात जावे लागेल

कृषी विभागाने मात्र सहसंचालक पदावर लिपिक संवर्गाऐवजी तांत्रिक संवर्गातून गणेश घोरपडे यांची नियुक्ती केली. त्यामुळे संतप्त झालेल्या लिपिक संवर्गाने २३ सप्टेंबरपासून राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू केले. संघटनेच्या सूत्रांनी सांगितले, की कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी आमच्यासोबत चर्चा करीत भूमिका जाणून घेतली. आंदोलन मागे घेण्याची विनंती आयुक्तालयाकडून करण्यात आली. त्यामुळे तीन ऑक्टोबरपासून आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे.

‘‘आम्ही आंदोलन स्थगित केले असले तरी मुद्दा सोडलेला नाही. कृषी विभागाने आस्थापना सहसंचालकपदावर नियुक्ती करताना २००९ च्या सेवाभरती नियमाचा भंग केला आहे. हाच मुद्दा आम्ही महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणासमोर (मॅट) मांडू,’’ असे संघटनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. लिपिक संवर्गात पूर्वी दहावी उत्तीर्ण व टंकलेखन कौशल्य अशा निकषावर भरती केली जात होती. आता मात्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पदवीधराचा निकष ठेवला आहे. तसेच, आस्थापना सहसंचालकपदावर थेट नियुक्ती केली जात नव्हती. त्याऐवजी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याला बढती दिली जात होती.

Agricultural Department Employees
Agriculture Department : अधिकाऱ्यांच्या पदनाम बदलाच्या मागणीस कृषिमंत्र्यांचा दुजोरा

लिपिक संवर्गात कृषी विभागातील विविध कार्यालयांमध्ये अधीक्षक पद मोठे असून त्यानंतर सहायक प्रशासकीय अधिकारी, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी व आस्थापना सहसंचालक अशी पदे बढतीने भरली जातात. सहायक प्रशासकीय अधिकारी पद ५० टक्के सरळसेवेतून; तर ५० टक्के पदोन्नतीने भरले जाते. अधीक्षक श्रेणीच्या सेवाज्येष्ठ अधिकाऱ्याला ही पदोन्नती मिळते. सरळसेवेतून सहायक प्रशासकीय अधिकारी भरताना लोकसेवा आयोगाने निकष ठेवले आहेत. उमेदवार पदवीधर असावा तसेच त्याला कोणत्याही विभागात अधीक्षकपदावर तीन वर्षे सेवा केल्याचा अनुभव असावा, असे हे निकष आहेत.

राजेश जाधव यांच्या नियुक्तीमुळे नियमभंग

लिपिक संवर्गातील अधिकारी राजेश जाधव यांना आस्थापना सहसंचालकपदी नियुक्त न करता नागपूरच्या वसंतराव नाईक कृषी व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेचे अप्पर संचालकपद देण्यात आले आहे. यामुळे सेवाभरती नियमाचा भंग झाल्याचे लिपिक संवर्गाचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com