Cooperation Minister of Uttarakhand  Agrowon
ॲग्रो विशेष

PDCC Bank : उत्तराखंडच्या सहकारमंत्र्यांची पीडीसीसी बॅकेला भेट

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (पीडीसीसी) उत्तरांखडचे सहकार, आरोग्य व शिक्षणमंत्री डॉ. धनसिंग रावत आणि राज्यसभेचे सदस्य नरेश बंसल यांनी सोमवारी (ता. २४) सदिच्छा भेट दिली.

Team Agrowon

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस (पीडीसीसी) उत्तरांखडचे सहकार, आरोग्य व शिक्षणमंत्री डॉ. धनसिंग रावत आणि राज्यसभेचे सदस्य नरेश बंसल यांनी सोमवारी (ता. २४) सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे व उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांनी स्वागत करून बँकेच्या आर्थिक व सांपत्तीक स्थितीबाबतची माहिती दिली.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सहकार क्षेत्रातील योगदान व बँकेच्या आर्थिक स्थितीबाबत डॉ. रावत यांनी कौतुक केले. उत्तराखंड राज्यामध्ये विविध कार्यकारी संस्थांच्या कामगिरीची माहिती देण्यात आली.

सहकार क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी राज्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण करून शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी करणेबाबत चर्चा केली व बँकेच्या कामगिरीची माहिती घेण्यासाठी उत्तराखंड राज्यातील अधिकारी भेट देण्यासाठी येणार असून त्यांनी ही बँकेच्या अधिकाऱ्यांना सदिच्छा भेट देण्यासाठी आमंत्रित केले.

देशातील इतर जिल्हा बँकांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आदर्श घ्यावा, असे मत राज्यसभेचे सदस्य नरेश बंसल यांनी व्यक्त केले व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Certificate Registration: महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी १२ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त, कृषिमंत्र्यांची माहिती

Ujni Dam Water : उजनीत पाणीसाठा मुबलक; तरी मासे घटले!

Agriculture Subsidy: कोल्हापुरात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या ४६४ लाभार्थ्यांना अनुदान

Okra Pest Attack: भेंडीवरील मावा, तुडतुडे आणि पांढरी माशीचे नियंत्रण

E-Pik Pahani : पीक पाहणीसाठी पैसे; गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT